WHO: मोठी बातमी! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:43 PM2022-01-30T16:43:29+5:302022-01-30T16:43:51+5:30

WHO: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली आहे.

Corona vaccine protects not only from the Corona but also these 20 diseases;says WHO | WHO: मोठी बातमी! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती

WHO: मोठी बातमी! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती

Next

मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आता जगभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. हा कोरोना आल्यापासून लोक इतर आजारांनाही घाबरत आहेत. पण, आता जागतिक आरोग्य संघटने(WHO) ने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरू आहे. पण, आता ही कोरोना लस कोरोनासोबतच इतर 20 आजारांवर उपयुक्त असल्याची माहिती डब्लूएचओने दिली आहे.

जगभरात करोनाने लाखो लोकांचे जीव घेतले. अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. पण, हा कोरोना लसीकरणामुमुळे नियंत्रणात येताना दिसत आहे. कोरोना लस हेच सध्या या आजारावरील परिणामकारक शस्त्र असल्याचे मत जाणकारांचे आहे. यातच आता कोरोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना लसीमुळे फक्त कोरोनाच नाही, तर इतर 20 आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली आहे. 

  1. कोव्हिड-19 (Covid-19)
  2. गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
  3. पटकी/कॉलरा (Cholera)
  4. घटसर्प (Diphtheria)
  5. इबोला (Ebola)
  6. हेप बी (Hep B)
  7. इन्फ्लुएंझा (Influenza)
  8. जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
  9. गोवर (Measles)
  10. मेंदुज्वर (Meningitis)
  11. गालगुंड (Mumps)
  12. डांग्या खोकला (Pertussis)
  13. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
  14. पोलिओ (Polio)
  15. रेबिज (Rabies)
  16. रोटा व्हायरस (Rotavirus)
  17. गोवर (Rubella)
  18. धनुर्वात (Tetanus)
  19. विषमज्वर (Typhoid)
  20. कांजण्या (Varicella)
  21. पीतज्वर (Yellow Fever)

Web Title: Corona vaccine protects not only from the Corona but also these 20 diseases;says WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.