Corona Vaccine : कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:40 PM2021-06-10T12:40:55+5:302021-06-10T12:57:56+5:30

Corona Vaccine : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र याच दरम्यान लसीचे डोस वाया जात असल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत.

corona vaccine us pharmacist sentenced to three years for destroying vaccine | Corona Vaccine : कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Corona Vaccine : कोरोना लसीचे डोस वाया घालवणं 'त्याला' पडलं चांगलंच महागात; 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

googlenewsNext

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 17 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रगत देशही कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून त्यापुढे हतबल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वच देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र याच दरम्यान काही ठिकाणी कोरोना लसीचे डोस वाया जात असल्याच्या धक्कादायक घटनाही समोर आल्या आहेत. कोरोना लसीचे डोस वाया घालवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. 

कोरोनाच्या संकटात सर्वच गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. याच दरम्यान निष्काळजीपणामुळे एका फार्मासिस्टकडून 500 हून अधिक डोस वाया गेले होते. त्यानंतर कोरोना लसीचे डोस वाया घालवणे फार्मासिस्टला चांगलंच महागात पडलं आहे. या दोषी फार्मासिस्टला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्टीवन ब्रांडेनबर्ग (46) असं या दोषी फार्मासिस्टचे नाव आहे. औषधी उत्पादनात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात त्याने त्याच्यावर असलेले आरोप मान्य केले होते. 

मिलवॉकी उत्तर येथील ऑरोरा मेडिकल सेंटरमध्ये त्याने मॉडर्ना लसीचे काही डोस अनेक तास रेफ्रिजरेटर बाहेर ठेवले होते. शिक्षा सुनावण्याआधी त्याने दिलेल्या वक्तव्यात केलेल्या चुकीबाबत माफी मागितली. या प्रकाराबद्दल खेद वाटत असून केलेल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्याने म्हटलं आहे. दोषी फार्मासिस्टने आपले सहकारी, कुटुंबीय आणि सर्वांचीच माफी मागितली आहे. दोषी फार्मासिस्टने रुग्णालयात आलेल्या कोरोना लसाचे डोस फ्रीजबाहेर ठेवले होते. त्यामुळे 500 हून अधिक डोस वाया गेले. वाया गेलेले बहुतांशी डोस नष्ट करण्यात आले. मात्र, जवळपास 57 जणांना डोस देण्यात आले होते. लशीचे डोस प्रभावी असल्याचे म्हटले जात होते. मात्र, वाया गेलेल्या लसीचे डोस दिल्यामुळे अनेकजण चिंतेत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे, कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. 

Web Title: corona vaccine us pharmacist sentenced to three years for destroying vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.