Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:25 AM2021-06-22T08:25:21+5:302021-06-22T08:27:44+5:30

Corona Vaccine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते.

Corona Vaccine : us president joe biden announces allocation plan 55 million vaccine to india asian countries | Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (Joe Biden) यांनी सोमवारी जागतिक स्तरावर आशियाई देशांना कोरोना व्हायसरच्या 5.5 कोटी लसी (Covid Vaccine) देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारत आणि बांगलादेश यासारख्या आशियाई देशांना 1.6 कोटी लसी देण्यात येणार आहेत. (us president joe biden announces allocation plan 55 million vaccine to india asian countries)

याआधी अमेरिकेने कोरोनाची 2.5 कोटी लसी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हे मिळून आतापर्यंत आठ कोटी लसींचे वितरण बायडन प्रशासनाने जाहीर केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जागतिक स्तरावर कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी या लसींचे वितरण जूनच्या अखेरपर्यंत करण्याचे ठरविले होते.

व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, 'राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जगभरातील कोरोना महामारी नष्ट करण्यासाठी आपला लढा सुरू ठेवला असून संपूर्ण जगाला लसी देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत आम्ही आमच्या स्थानिक पुरवठ्यांमधून लसी देण्याची योजना आखली आहे. राष्ट्राध्यक्षांनी जूनअखेरपर्यंत आठ कोटी लसींचे वाटप करण्याचे म्हटले आहे. याचबरोबर, व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, आठ कोटी लसींपैकी 75 टक्के कोव्हॅक्स मोहिमेद्वारे वितरित केल्या जातील, तर 25 टक्के लस संक्रमणाच्या मोठ्या घटनांचा सामना करणाऱ्या देशांना पुरवल्या जातील.

आतापर्यंत जगात 17.92 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण
आता जगातील कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. रविवारी जगात 2 लाख 95 हजार 229 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर या दरम्यान 3 लाख 25 हजार 447 लोकांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जगात 17.92 कोटीहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यापैकी 38.82 लाख लोकांचा मृत्यू झाला, तर 16.38 कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

अमेरिकेत 90 टक्के लसीकरण
दरम्यान, कोरोनाचा परिणाम सर्वाधिक अमेरिकेत झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत 90 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. येथील लोक आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरू शकतात.

Web Title: Corona Vaccine : us president joe biden announces allocation plan 55 million vaccine to india asian countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.