बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:51 AM2022-12-22T11:51:13+5:302022-12-22T11:55:48+5:30

Corona Virus China : बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे.

Corona Virus China sees massive surge in sale of lemons amid covid 19 wave | बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

googlenewsNext

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लाटे दरम्यान, लोक आता संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. बीजिंग आणि शांघाईसह चीनमधील अनेक शहरांमध्ये लिंबू आणि इतर काही फळांची विक्री तेजीत आहे. बीजिंग आणि शांघाई, सध्या ही दोन शहरे कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की लोक त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.

आतापर्यंत कोणताही अधिकृत अहवाल आणि त्याच्या पुराव्यांवरून व्हिटॅमिन सी कोरोना व्हायरस बरा करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते याची पुष्टी झालेली नाही. लिंबू आणि व्हिटॅमिन सी असलेल्या फळांव्यतिरिक्त, चीनमध्ये ताप, वेदना कमी करणारी आणि फ्लूची औषधांची मागणी वाढली आहे. ते खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. चीनमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

जागतिक आरोग्य संघटनेच्या डेटावरून असे दिसून आले आहे की जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अलिकडच्या काळात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण महिने आणि दिवसांऐवजी तासांत दुप्पट होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. धडकी भरवणारं चित्र सध्या चीनमध्ये पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने रुग्णालयं खचाखच भरली आहेत. एकही बेड उपलब्ध नसल्याने जमिनीवर रुग्णांना ठेवून उपचार केले जात आहेत. 

कोरोनाग्रस्त वडिलांना घेऊन लेकीची धावपळ; 'कोणी मेलं तरच मिळेल बेड' असं मिळतंय उत्तर

चीनमधील एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीच्या वडिलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोना झाला होता. पण त्यांना अजूनही बेड मिळालेला नाही. तिने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. "माझे वडील खूप आजारी होते. त्यांना घेऊन आम्ही तीन रुग्णालयात गेलो. पण बेड मिळाला नाही. त्यांच्यावर उपचारही झाले नाहीत. डॉक्टर म्हणाले, तुझे वडील खूप आजारी आहेत. पण आमच्याकडे बेड रिकामे नाहीत. आज दहा लोक मेल्यानंतर दहा बेड खाली झाले. आता या ठिकाणी एकही बेड नाही. कोणी तरी मेल्यावरच सर्वात आधी ज्या रुग्णांनी बेडसाठी नंबर लावला आहे, त्यांना बेड मिळेल. त्यानंतर तुझ्या वडिलांना बेड मिळेल" असं डॉक्टर सांगत असल्याचं ही तरुणी व्हिडीओमध्ये म्हणाली.
 

Web Title: Corona Virus China sees massive surge in sale of lemons amid covid 19 wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.