CoronaVirus : "जगाला आज मिळू शकते कोरोना व्हॅक्सीन," 'त्या' एका ट्विटने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 04:40 PM2020-07-20T16:40:25+5:302020-07-20T16:44:14+5:30
रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपर्ण जग कोरोनाची देवा प्रमाणे वाट बघत आहे. असे असतानाच, आरोग्य क्षेत्रातील जगात सर्वात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक 'द लॅन्सेट'चे संपादक रिचर्ड होर्टन यांचे एक ट्विट लोकांत चर्चेचा विषय बनले आहे.
रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत.
रिचर्ड होर्टन यांनी ट्विट केले, की 'उद्या. व्हॅक्सीन. फक्त सांगत आहे.' त्यांच्या या ट्विटसंदर्भात सोशल मीडियापासून ते जगभरातील देशांत चर्चांना उधाण आले आहे. जर व्हॅक्सीनचे परिणाम घोषित केले गेले आणि ते सकारात्मक असतील, तर ते कुण्या एखाद्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नसतील.
Tomorrow. Vaccines. Just saying.
— richard horton (@richardhorton1) July 19, 2020
ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार होत असलेल्या कोरोना व्हॅक्सीनसंदर्भात आज मोठी घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे. सध्या, जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) जगातील 140 व्हॅक्सीन्सवर लक्ष ठेऊन आहे. यापैकी जवळपास दोन डझन व्हॅक्सीन्स मानवी चाचणीच्या वेगवेगळ्या स्तरावर आहेत.
चायनीज कंपनी सिनोव्हॅक बायोटेक ब्राझीलमध्ये परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी तयार आहे. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ/एस्ट्राजेनेका यूकेमध्ये II/III आणि दक्षिण आफ्रिका-ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यावर आहे. वॅक्सीन तयार करण्याच्या कामात लागलेल्या इतर कंपन्यांत जर्मन कंपनी बिनोटेक फिझरसोबत व्हॅक्सीन विकसित करण्याच्या तयारीत आहे. भारतातही दोन व्हॅक्सीनचे मानवी परीक्षण सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"
चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!
बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप