Shanghai Lockdown: कोरोनाची दहशत! चीनमध्ये लॉकडाऊन; घरात कैद लोकांचा ओरडतानाचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:50 PM2022-04-11T17:50:35+5:302022-04-11T17:51:41+5:30

शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे घरात कैद असलेल्या लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंचीही टंचाई जाणवू लागली आहे.

Corona Virus in china Shanghai lockdown videos going viral people screaming from apartments | Shanghai Lockdown: कोरोनाची दहशत! चीनमध्ये लॉकडाऊन; घरात कैद लोकांचा ओरडतानाचा VIDEO व्हायरल

Shanghai Lockdown: कोरोनाची दहशत! चीनमध्ये लॉकडाऊन; घरात कैद लोकांचा ओरडतानाचा VIDEO व्हायरल

Next

चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यामुळे येथे 'झिरो कोविड पॉलिसी'चे काटेकोरपणे पालन केले जात आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर असलेल्या शांघायमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारने संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन लावला आहे. यातच, कठोर लॉकडाऊनमुळे नाराज लोकांचे व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात हे लोक आपल्या अपार्टमेंटमध्ये ओरडदाना दिसत आहेत. 

याशिवाय, लोकांचे स्थानिक अधिकाऱ्यांसोबत भांडतानाचे व्हिडिओही सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर समोर येत आहेत. एवढेच नाही, तर हे लोक एवढ्या कठोर लॉकडाऊनचा गंभीर परिणाम होईल, असा इशाराही देताना दिसत आहेत. चीनने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासूनच शांघायमध्ये कठोर लॉकडाऊन लावत, येथील तब्बल 26 कोटी जनता घरात कैद केली आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ. एरिक फीगल-डिंग यांनी शांघायमधील काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. याच बरोबर, चीनमधील लोक अपार्टमेंटमधून स्थानिक भाषेत ओरडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, 'लॉकडाऊनच्या सातव्या दिवशी, शांघायमधील रहिवासी आपल्या उंच अपार्टमेंटमधून ओरडत आहेत. ओरडणारी एक व्यक्ती म्हणत आहे, की अनेक समस्यां उद्भवणार आहेत. तसेच, लोकांना अधिक काळ थांबवून ठेवले जाऊ शकत नाही. असेही त्याने म्हटले आहे.

या व्हिडिओच्या सत्यतेसंदर्भात पुष्टी करताना त्यांनी लिहिले, 'हा व्हिडिओ पूर्णपणे व्हेरिफाईड आहे. माझ्या सूत्रांनी तो व्हेरिफाय केला आहे. शांघानी ही एक स्थानिक बोली भाषा आहे. चीनमधील 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 14 कोटी लोकच चीनी बोलतात. माझा जन्म तेथेच झाल्याने, मला ही भाषा माहीत आहे. 

शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे घरात कैद असलेल्या लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंचीही टंचाई जाणवू लागली आहे. येथील लोक भाजी-पाला अधिक दिवस पुरविण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. यासंदर्भातीलही काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.


 

Web Title: Corona Virus in china Shanghai lockdown videos going viral people screaming from apartments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.