Corona Virus : भीषण, भयावह! जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट; आठवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:50 PM2022-12-28T20:50:58+5:302022-12-28T21:02:06+5:30
Corona Virus : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जपान कोरोनाच्या आठव्या लाटेचा सामना करत आहे. देशात बुधवारी कोरोनामुळे जे मृत्यू झाले त्याचा आकडा हा सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात ४१५ लोकांनी आपला जीव गमावला आहे.
वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जपानमध्ये आतापर्यंत २८७६४२२३ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ५६२२८ जणांचा मृत्यू झाला आहे. जपानमध्य कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे २६०००० हे ऑगस्टमध्ये समोर आले होते. जपानची राजधानी टोकियोमध्यो कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.
टोकियोमध्ये ३९२५०३८ रुग्ण सापडले आहेत. यानंतर ओसाकामध्ये २५०३७८६ आणि कानागावामध्ये १९४५४९२ रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय आइची, सैतामा, फुकुओका, चीबी, ह्योगो आणि होक्कोइदोमध्ये देखील रुग्ण सातत्याने वाढत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, गेल्या सात दिवसांत जपानमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे आढळून आले आहेत. अमेरिकेनंतर आता जपानमध्ये कोरोना मृतांचा आकडा हा सर्वात जास्त आहे. चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"