Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 11:46 AM2022-01-15T11:46:47+5:302022-01-15T11:47:30+5:30
हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे.
सध्या अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यावेळच्या कोरोना रुग्णसंख्येने तर गेल्या वर्षी रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या एकूण अमेरिकन रुग्ण संख्येलाही मागे टाकले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत, तब्बल 142,388 कोरोना बाधितांना देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.
हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे.
अफ्रिकेत कमी होतेय संख्या -
तसेच, दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात भाष्य करताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेत कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, यावेळी तेथे रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आकडेवारीचा विचार करता, आफ्रिकेतील एकूण रुग्ण संख्या 10.2 मिलियनपेक्षाही अधिक झाली आहे. यातच, कोरोना रुग्णसंख्येत झालेली नोंद लक्षात घेता, गेल्या आठवड्याच्या तुलनेत साप्ताहिक रुग्ण संख्या 9 जानेवारीपर्यंत सात दिवस स्थिर होती.
आफ्रिकेसाठी डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक मात्शिदिसो मोएती म्हणाले, सुरुवातीच्या संकेतांनुसार, आफ्रिकेतील चौथी लाट वेगवान, पण संक्षिप्त स्वरुपाची होती. परंतु अस्थिर नाही. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत कोरोना काळात, संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली होती, परंतु गेल्या एका आठवड्यात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ओमायक्रॉन आढळून आला. मात्र, आता याच्या साप्ताहिक संसर्गामध्ये नऊ टक्क्यांची घट दिसून आली आहे.