Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 04:10 PM2021-12-08T16:10:17+5:302021-12-08T16:11:11+5:30

जगभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे.

Corona Virus Omicron variant impact on kids children in third wave WHO report | Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका? WHOचा अहवाल, Omicron चे भीतीदायक संकेत

Next

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटने जगातील अनेक देशांमध्ये हात-पाय पसरले आहेत, यामुळे पुन्हा एकदा मुलांच्या लसीकरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुलांनाही फटका बसणार का, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. (Omicron Varinat Impact on Children and Corona Third Wave)

खरे तर, जगभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. यात दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ओमाक्रॉन मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती आहे. भारतासाठीही ही धोक्याची घंटा आहे. कारण भारतात फक्त 18 वर्षांवरील लोकांचेच लसीकरण करण्यात आले आहे.

WHO च्या तज्ञांच्या याच गटाने सांगितले होते की, जे लोक प्रौढ आहेत त्यांना सध्या ओमायक्रॉनची सामान्य लक्षणे दिसली आहेत. बहुतेक संक्रमित लोक asymptomatic आहेत. यापूर्वी WHO च्या युरोप कार्यालयानेदेखील सांगितले होते की, 5 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. 

डब्ल्यूएचओ युरोपचे रिजनल डायरेक्टर डॉ. हँस क्लूज यांनी म्हटले होते की, युरोपातील अनेक देशांमध्ये मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण दोन ते तीन पटींनी वाढले आहे. तसेच, वृद्ध, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांपेक्षा लहान मुलांना कमी गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत, जगभरातील 21 देशांमध्ये 432 Omicron प्रकरणे समोर आली आहेत.

ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेत मुले भर्ती होत आहेत, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की मुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग दिसू शकतो. याशिवाय, ज्या प्रकारे केस वाढल्या आहेत, त्याकडे कदापी दूर्लक्ष करू नये. तसेच पूर्णपणे तयारीत राहावे, असेही ग्रुप ऑफ एक्‍सपर्टने म्हटले आहे.

Web Title: Corona Virus Omicron variant impact on kids children in third wave WHO report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.