कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHO च्या तपासपथकाचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 09:03 PM2021-02-09T21:03:41+5:302021-02-09T21:07:19+5:30

Corona Virus: जगभरात लाखो लोकांच्या मृत्यूस आणि करोडो लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या चीनवर साऱ्या जगाचा रोष होता. कोरोनाची वेळेत माहिती दिली नाही, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना पसरविण्यात आल्याचे गंभीर आरोप अमेरिकेसह साऱ्या जगाने केले होते.

Corona virus spread from China's Wuhan lab? claim by the WHO investigation team | कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHO च्या तपासपथकाचा खळबळजनक दावा

कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला? WHO च्या तपासपथकाचा खळबळजनक दावा

Next

जागतिक आरोग्य संघटना WHO ने कोरोनाचा उगम कुठून झाला हे तपासण्यासाठी वर्षभराने चीनला तपास पथक पाठविले होते. डब्ल्यूएचओला देखील चीनने परवानगी दिली नव्हती. या पथकाचा तपास पूर्ण होत आला आहे. या पथकातील एका तज्ज्ञाने कोरोना चीनच्या वुहान लॅबमधून पसरला नसल्याचा दावा केला आहे. कोरोनाने कोणत्यातरी प्रजातीपासून मानवाच्या शरीरात प्रवेश केला असेल, असे त्यांनी मंगळवारी स्पष्ट करत वुहानच्या लॅबला क्लिन चिट दिली आहे. (WHO gave clin chit to China, says no indication from Wuhan lab)


जगभरात लाखो लोकांच्या मृत्यूस आणि करोडो लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या चीनवर साऱ्या जगाचा रोष होता. कोरोनाची वेळेत माहिती दिली नाही, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना पसरविण्यात आल्याचे गंभीर आरोप अमेरिकेसह साऱ्या जगाने केले होते. यामुळे लॉकडाऊन काळात जगावर महायुद्धाचे ढग पसरू लागले होते. या साऱ्यात WHO च्या अध्यक्षांची भूमिका संशयास्पद होती. यामुळे WHO वरही संशय व्यक्त करण्यात येत होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखला होता. तर चीनने आणखी तीन लाख कोटी डॉलर WHO ला दिले होते. 


वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याच्या साऱ्या चर्चांचे WHO ने खंडन केले आहे. डब्ल्यूएचओच्या तपासपथकातील अन्न सुरक्षा आणि जंतूरोग तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी सांगितले की, वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरण्याची शक्यता नाहीय. तो एखाद्या जनावरातून पसरला आहे. वुहानच्या लॅबमधून पसरल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. यामुळे आम्ही आता वुहानच्या बाजारावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. 


WHO च्या पत्रकारपरिषदेत सिंघुआ विश्वविद्यालयाचे एक चिनी तज्ज्ञ लियांग वानियान यांनी सांगितले की, SARS-CoV-2 हा व्हायरस पाखे किंवा पँगोलिनमध्ये सापडतो. हेच कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत असतील. कारण कोरोना आणि त्या व्हायरसमध्ये खूप समानता आढळली आहे. मात्र, अद्याप या प्रजातींमध्ये कोणाशीही कोरोनाचा संबंध असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. 


सध्या आम्ही सर्व कड्या जोड़ण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या मार्केटमधून लोक घाईगडबडीत बाहेर पडले. आपली उपकरणे आणि सामान सोडून गेले. त्यांनी त्यावेळची परिस्थिती काय होती त्याचेही पुरावे मागे सोडले आहेत. त्याच गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रीत केले, असेही आणखी एका तज्ज्ञांनी सांगितले.
 

Web Title: Corona virus spread from China's Wuhan lab? claim by the WHO investigation team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.