corona virus: भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:40 AM2023-09-05T11:40:31+5:302023-09-05T11:41:46+5:30

corona virus: अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन यांची सोमवारी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती.  मात्र वर्तमानकाळात त्यांच्यामध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत.

corona virus: US President Joe Biden's wife infected with Corona virus before India visit | corona virus: भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग 

corona virus: भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग 

googlenewsNext

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर संमेलनासाठी जगभरातील दिग्गज नेते भारतामध्ये येणार आहेत. मात्र त्याचदरम्यान जगातील अनेक देशांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. कोविड-१९ च्या एरिसनंतर आता पिरोला विषाणू किंवा बीए २.८६ नावाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरातील जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला आतापर्यंत समोर आलेल्या सर्व व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिरोला व्हेरिएंटचे रुग्ण डेन्मार्क, यूके, दक्षिण आफ्रिका, इस्राइल आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये सापडले आहेत.

यादरम्यान, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र या चाचणीचे परिणाम निगेटिव्ह आले आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडन यांची सोमवारी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती.  मात्र वर्तमानकाळात त्यांच्यामध्ये केवळ सौम्य लक्षणे दिसत आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नीच्या सकारात्मक चाचणीनंतर विषाणूचं परिक्षण करण्यात आलं. त्यामध्ये त्याचे परिणाम निगेटिव्ह आले आहेत. व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले की, राष्ट्रपती नियमितपणे टेस्ट कायम ठेवतील. तसेच लक्षणांसाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलं आहे. जिल बायडन ह्या सध्या डेलावेयरच्या रोहोबोथ येथील घरातच राहतील.   

Web Title: corona virus: US President Joe Biden's wife infected with Corona virus before India visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.