अमेरिकेत कोरोनाचा वणवा त्यात दंगलीचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:56 AM2020-06-02T04:56:49+5:302020-06-02T04:57:09+5:30

अमेरिका : उग्र निदर्शनांमुळे ट्रम्प तासभर बंकरमध्ये

Corona's death and sparked riots in America | अमेरिकेत कोरोनाचा वणवा त्यात दंगलीचा भडका

अमेरिकेत कोरोनाचा वणवा त्यात दंगलीचा भडका

Next

वॉशिंग्टन : मिनिओपोलिस या मिनेसोटा राज्याच्या राजधानीत जॉर्ज प्लॉईड या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गुडघ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट रविवारी व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली. निदर्शनांची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया व १४ वर्षांचा मुलगा बरॉन यांना सुमारे एक तासभर व्हाईट हाऊसच्या खाली तळघरात असलेल्या बंकरमध्ये हलवावे लागले.


व्हाईट हाऊसपासून अगदी जवळ असलेल्या लफायटे पार्कमध्ये जमलेल्या सुमारे एक हजार निदर्शकांचा संताप एवढा अनावर झाला होता की त्यांनी दगडफेक करून परिसरातील अनेक इमारतींचे नुकसान केले व अनेक वाहनांची जाळपोळ केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचाही वापर केला. वॉशिंग्टन ‘डीसीमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी १,७०० हून अधिक संघीय पोलीसही तैनात करण्यात आले होते.


जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या निदर्शनांचा रविवारी सलग सहावा दिवस होता. या संतापाचे, निदर्शनांचे लोण अमेरिकेतील १४० शहरांमध्ये पसरले असून, या परिस्थितीमुळे किमान ४० शहरांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)


आसºयाची ५० वर्षांतील पहिली वेळ
च्दहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांच्या हत्येनंतर सन १९६७ मध्ये उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानले जात आहे.

...आणि पोलिसांनी गुडघे टेकले
हे आहेत अमेरिकेच्या फ्लोरिडामधील पोलीस. जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत निदर्शने सुरु आहेत. एका रॅलीदरम्यान या पोलिसांनी अक्षरश: गुडघे टेकविले.

Web Title: Corona's death and sparked riots in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.