CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:35 PM2020-08-12T18:35:02+5:302020-08-12T18:44:29+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मॉस्को -रशियाने कोरोना लस तयार केली आहे, मात्र, ही लस देण्यासाठी वयाचीही अट आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना देण्याची परवानगी नाही. Fontanka न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात दावा करण्यात आला आहे, की डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, प्रेग्नन्ट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील ही लस देण्यात येणार नाही.
Fontanka न्यूज एजन्सीने रशियाच्या सरकारी दस्तऐजांच्या आधारे प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे, की 18 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना ही लस देण्यात येणार नाही. कारण या लोकांवर होणाऱ्या परीणामांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. याचाच अर्थ अद्याप यावर अभ्यास करण्यात आलेला नाही.
जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात व्यक्त केलीय चिंता -
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आवश्यक -
लस सुरक्षित आणि प्रभावी आहे अथवा नाही, हे माहित होण्यासाठी तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आवश्यक असल्याचे जगभरातील तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत. WHOनेही म्हटले आहे, की दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यानंतर लस योग्य आहे अथवा नाही याची माहिती मिळू शकते.
12 ऑगस्टपासून लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात -
खुद्द रशियानेही म्हटले आहे, की यूएई, ब्राझील, मॅक्सिको आणि रशियात 12 ऑगस्टपासून लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. यात 2000 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. sputnikvaccine.com ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने 11 ऑगस्टला आणीबाणीसारख्या नियमांअंतर्गत या लसीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील परिक्षणाच्या आधारेच मंजुरी दिली आहे. मात्र पुतिन यांनी, लसीची सर्वप्रकारे तपासणी करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
इतर औषधांसोबत रशियन लसीची काय रिअॅक्शन होते? अद्याप अभ्यास करणे बाकीच -
इतर औषधांसोबत रशियन लसीची काय रिअॅक्शन होते, यावरही अद्याप अभ्यास करणे बाकी आहे. रशियातील गामलेया इंस्टीट्यूटने म्हटले आहे, की कायदेशीरपणे मुलांवर लसीचे परीक्षण करण्यापूर्वी अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतात. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, आता आम्ही यावर काम करणार आहोत.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस