CoronaVaccine : रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीसंदर्भात राष्ट्रपती पुतिन यांनी दिली आनंदाची बातमी; केला असा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:57 PM2020-08-29T14:57:12+5:302020-08-29T15:03:09+5:30
यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती.
मॉस्को -रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देशीची दुसरी कोरोना लस अत्यंत चांगली असल्याचे म्हटले आहे. पुतिन म्हणाले, रशियाची दुसरी कोरोना लस EpiVacCorona ची स्पर्धा पहिली लस Sputnik V सोबत असेल. एवढेच नाही, तर कोरोना लस बाजारात आणण्यासाठी रशिया जगाला मार्ग दाखवत आहे, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.
यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती.
पुतिन यांनी असेही म्हटले होते, की पहिली लस Sputnik V त्यांच्या मुलीलाही देण्यात आली. मात्र यानंतर, ज्या स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली, त्यांच्यात अनेक साइड इफेक्ट्स दिसून आल्याचे वृत्तही माध्यमांतून प्रसिद्ध झाले होते.
पुतिन यांनी म्हटले आहे, की "सप्टेंबर महिन्यात आणखी एक लस येत आहे. ही लस प्रसिद्ध व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीने तयार केली आहे." तर वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, की रशियाच्या दुसऱ्या कोरोना लशीमुळेही स्नायूंना वेदनांचा सामना करावा लागू शकतो.
पुतिन म्हणाले, व्हेक्टर इंस्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी एक चांगली लस तयार केली आहे. ही लस लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. रशियाची पहिली लस गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अॅपिडेमिलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली होती.
20 देशांकडून लशींची ऑर्डर -
तत्पूर्वी, पहिल्या कोरोना लशीची घोषणा केल्यानंतर आपल्याला 20 देशांकडून लशीसाठी मोठ्या ऑर्डर्सदेखील मिळाल्या असल्याचा दावा रशियाने केला आहे. तसेच रशिया शिवाय, भारत, अमेरिका, इग्लंड आणि चीन हे देशही करोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशांच्या लशींचेही तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे.
रशियात पुढच्या महिन्यात लसीकरण सुरू होण्याची शक्यता -
गमलेया रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्झँडर गिंट्सबर्ग यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 15 ते 20 तारखेदरम्यान देशात लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लशीची दोन भागांत विभागणी केली जाणार आहे. साधारणपणे 15 ते 20 सप्टेंबरपर्यंत चाचणी पूर्ण होऊ शकते. रशियाच्या आरडीआईएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक-व्ही ही लस शेवटच्या टप्प्यातील चाचणीत आहे. ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा