CoronaVaccine News : आनंदाची बातमी! भारतात तयार होणार १ अब्ज लसी; चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचं मोठं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:10 PM2021-03-12T19:10:54+5:302021-03-12T19:38:13+5:30
CoronaVaccine News & Latest Updates : १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
(Image Credit- ABC News )
जानेवारीपासून कोरोना व्हायरसविरुद्ध लसीकरण मोहिम सुरू झाली. त्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळालं. पण दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रसाराचा धोका वाढत असल्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उद्रेकाची धास्ती आहे. यामुळेच लसीकरणाच्या मोहिमेचा वेगही वाढवला आहे. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी होऊ घातलेल्या क्वाड शिखर परिषदेत भारतासाठी दोन सकारात्मक बातम्या येण्याची शक्यता आहे.
भारत जगाच्या लस उत्पादनाचं केंद्र बनू शकते. त्यासाठी अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वतः पुढाकार घेणार असून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भातील सुरूवात होण्याची शक्यता आहे. याशिवाय जगासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तब्बल १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनच्या आक्रमतेला पर्याय उभा करण्याबाबत कुठलाही आड पडदा न ठेवता बोलणार आहेत. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पतंप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ऑनलाईन शिखर परिषदेत सामील होणार आहेत. साधारपणे ९० मिनिटांच्या या बैठकीत चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील वाढती आक्रमकता, भारत-चीन सीमेवर वाढता तणाव, याविषयावर खुल्या दिलानं चर्चा होणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.
दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस
जसजसी देशभरात कोरोना लसीची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे उत्पादनही वाढत आहे. उत्पादन वाढल्यामुळे कोरोना लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. आता सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्डची (Covishield) ची ऑर्डर दिली आहे. त्यातील एक डोसची किंमत १५० रूपये आहे. पण ५ टक्के जीएसटीसुद्धा (Goods and Service Tax) द्यावा लागणार आहे. म्हणजेच लसीच्या एका डोसची किंमत १५७.५० रुपये इतकी असेल. याआधी जानेवारीमध्ये ऑर्डर देण्यात आली होती. त्यावेळी लसीच्या एका शॉटची किंमत २१० रूपये इतकी होती.
सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीच्या डोसची ऑर्डर वाढलेली आहे. याचा फायदा सगळ्यांनाच मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यात किमतीत सुट मिळाली आहे.
हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं या टप्प्यातील एका डोसचे वितरण १५० रूपयांमध्ये करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यात ५ टक्के जीएसटीसुद्धा लागणार आहे. म्हणजेच लसीच्या एक डोसची किंमत १५७.५० रूपये असेल. ही किंमत जगभरातील इतर लसींच्या तुलनेत कमीत कमी असल्याचे सांगितले जात आहेत. या टप्प्यात किती शॉट्सची ऑर्डर दिली आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.