Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचे १३ हजार नवे रुग्ण, संसर्गाच्या भयावह वेगाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:41 AM2022-04-04T06:41:26+5:302022-04-04T06:41:53+5:30

Coronavirus In China: चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १३ हजार रुग्ण आढळले. दाेन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चीनमध्ये प्रथमच इतक्या संख्येत रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून शांघाय हे त्याचे मुख्य केंद्र बनले आहे.

Coronavirus: 13,000 new coronavirus patients in China | Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचे १३ हजार नवे रुग्ण, संसर्गाच्या भयावह वेगाने चिंता वाढवली

Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचे १३ हजार नवे रुग्ण, संसर्गाच्या भयावह वेगाने चिंता वाढवली

Next

बीजिंग : चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १३ हजार रुग्ण आढळले. दाेन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट आल्यापासून चीनमध्ये प्रथमच इतक्या संख्येत रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये सध्या कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून शांघाय हे त्याचे मुख्य केंद्र बनले आहे.
कमालीचा संसर्गजन्य असलेला ओमायक्रॉन विषाणू डझनभरपेक्षा जास्त प्रांतांत पसरला असून चीनच्या शून्य कोविड धोरणाला त्याने विस्कळीत केले आहे. शून्य कोविड धोरणामुळे मार्च २०२२ पर्यंत नव्या रुग्णांची संख्या दोन किंवा तीन आकड्यांपर्यंत मर्यादित राखण्यात यश आले होते. संपूर्ण जग लॉकडाऊन व निर्बंधांतून बाहेर पडले असताना चीनमध्ये प्रवासावर निर्बंध, ठरावीक ठिकाणी लॉकडाऊन आणि जनतेत जाऊन चाचण्या करून घेण्यास सांगितले जात आहे.

भारतात कोरोनाचे १,०९६ रुग्ण, मृत्यू ८१
देशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १,०९६ रुग्ण आढळले, तर ८१ जणांचा मृत्यू झाला. या ८१ मृत्यूंत एकट्या केरळमधील ७४ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. 

१३,०१३
उपचाराधीन रुग्णांची संख्या
५,२१,३४५
देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या 
४३२ 
रुग्ण गेल्या २४ तासांत बरे झाले आहेत. 
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत लसीच्या १८४.६६ कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Coronavirus: 13,000 new coronavirus patients in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.