Coronavirus: सौदी अरबच्या रॉयल फॅमिलीत १५० जणांना कोरोनाची लागण; प्रिन्स सलमानही आयसोलेशनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:11 PM2020-04-09T17:11:56+5:302020-04-09T17:12:15+5:30
अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने मोठा खुलासा केला आहे.
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे फक्त लोकांचे मृत्यू होत नाही तर अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत जगातील १५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
याचदरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने मोठा खुलासा केला आहे. या दैनिकाच्या वृत्तानुसार सौदी अरबच्या रॉयल फॅमिलीतील १५० सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र सौदीमध्ये ही गोष्ट उघड झाली नाही. पण न्यूयॉर्क टाईम्सने हा दावा केला आहे. सौदी अरबमध्ये पहिल्या प्रकरणाच्या ६ आठवड्यानंतर रॉयल फॅमिलीत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सौदी अरबचे क्राऊन प्रांस मोहम्मद बिन सलमान, प्रिन्स फैसल बिन बंदर, बिन अब्दुल अजीज अल सऊद हेदेखील आयोसेलेशनमध्ये आहेत.
त्याचशिवाय सौदी अरबमध्ये संभ्रांत रुग्णालयात रॉयल फॅमिलीसाठी ५०० बेड्सचं स्पेशल तयार ठेवण्यात आले आहेत. सौदी अरब राजघराण्यातील अनेक लोक विविध देशात फिरत असतात. सौदी अरबमध्ये आतापर्यंत ३ हजारांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.