Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:35 AM2020-03-21T09:35:37+5:302020-03-21T09:44:42+5:30

Coronavirus : जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, आणि 4G नंतर आता 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

Coronavirus 5g technology can help curb corona virus and other epidemic SSS | Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा

Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्दे5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार असा दावा आता चीनने केला आहे.5G थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने Contagion मॉनिटरिंग करता येतं. 5G तंत्रज्ञानाच्या चांगल्या स्पीडचा हेल्थकेअर सिस्टमला खूप फायदा होतो.

बीजिंग - वेगाने वाढणाऱ्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय केले जात आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. तर जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  2,69,911 वर पोहोचली आहे. याच दरम्यान 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार असा दावा आता चीनने केला आहे. जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, आणि 4G नंतर आता 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा वापर आता हा कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

5G थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने Contagion मॉनिटरिंग करता येतं. याच्या मदतीने कोणत्याही वस्तूचं तापमान मोजता येऊ शकतं. त्याचबरोबर त्याला हात न लावता केवळ मशीनच्या साह्याने वस्तूच्या तापमानासंबंधीत अलर्ट पाठवला जातो. चीनने एका संशोधनातून हा दावा केला आहे. चीनच्या अनेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी हुवावेसोबत  COVID-19 वर उपचार करणाऱ्या रुग्णालयात 5G नेटवर्क एका वेगळ्या पद्धतीने सेटअप केलं आहे. 5G तंत्रज्ञानाच्या चांगल्या स्पीडचा हेल्थकेअर सिस्टमला खूप फायदा होतो. तसेच कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना रुग्णाचं मॉनिटरिंग, डेटा कलेक्शन आणि इतर गोष्टींसाठी मदत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

china launches its 5g network ahead of schedule rolls out worlds largest 5g mobile phone network | चीनमध्ये इंटरनेट सुस्साट, 50 शहरांत 5G सेवा सुरू

कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या  2,69,911 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 236 वर पोहोचली आहे. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यामध्ये इटलीचे 17, फिलिपिन्सचे 2, ब्रिटनचे 2, कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

कोरोना विषाणूने चीननंतर आता युरोप खंडाला विळखा घातला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका इटलीला बसला असून, आज दिवसभरात इटलीमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

 

Web Title: Coronavirus 5g technology can help curb corona virus and other epidemic SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.