CoronaVirus News: बीजिंगमध्ये आढळले ६७ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:53 AM2020-06-16T02:53:05+5:302020-06-16T02:53:24+5:30
बीजिंगच्या मांस बाजारात कोरोना विषाणूची लागण एकाला झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये या संसर्गाचा फैलाव झाला.
बीजिंग : चीनमधील कोरोनाची साथ नियंत्रणात आणल्याचे त्या देशाचे दावे राजधानी बीजिंगमधील सद्यस्थितीने फोल ठरविले आहेत. बीजिंगमध्ये कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळून आल्याने तेथील आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. त्यामुळे या शहरात सरकारने आता सामूहिक कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्याद्वारे ३० मेपासून आतापर्यंत २९ हजारपेक्षा अधिक लोकांची चाचणी करण्यात आली. बीजिंग आरोग्य आयोगाचे प्रवक्ते गाओ शीओजून यांनी ही माहिती दिली. बीजिंगच्या मांस बाजारात कोरोना विषाणूची लागण एकाला झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये या संसर्गाचा फैलाव झाला. सामूहिक चाचणीतील २९,३८६ लोकांपैकी १२,९७३ जणांना कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाकीच्यांचा चाचणी अहवाल लवकरच हाती येईल.