CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:23 PM2020-08-09T16:23:59+5:302020-08-09T16:27:37+5:30
अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.
कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता जगभरातील वेगवेगळ्या देशांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.
अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ जुलैमध्येच कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे की, त्यांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे. जगात कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या 1 कोटी 98 लाख झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे अमेरिकेतील 51,50,060 लोक संक्रमित आहेत, त्यानंतर ब्राझीलचा नंबर लागतो, जेथे 30,13,369 लोक संक्रमित आहेत. तसेच 21,53,010 लोक भारतात संक्रमित झाले आहेत.
हेही वाचा
मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा
मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा
केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट
Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर
चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ