Coronavirus : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर! अमेरिकेत 11 भारतीयांचा मृत्यू, 16 जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:25 PM2020-04-09T18:25:21+5:302020-04-09T18:36:39+5:30
Coronavirus : अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.
वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,550 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 15,19,571 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.
कोरोनामुळे अमेरिकेत 11 भारतीयांचामृत्यू झाला असून 16 जणांना त्याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत हजारो जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चार लाखांपेक्षा जास्त झाला आहे. 16 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील 10 जण हे न्यूयॉर्कमधील असून सहा जण हे न्यूजर्सीमधील आहेत. कोरोनाने मृत्यू झालेले सर्वजण पुरुष आहेत. मृतांमधील चार जण हे न्यूयॉर्क शहरामध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करत होते. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफनhttps://t.co/EwMmeP2IGH#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
फ्लोरिडामध्ये एका भारतीयाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. तसेच कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाली असून त्यांचे राष्ट्रीयत्व स्थानिक प्रशासनाकडून तपासले जात आहे. 16 कोरोनाग्रस्तांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या चारही महिलांना सेल्फ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 8 जण न्यूयॉर्क, 3 जण न्यूजर्सी आणि अन्य टेक्सास आणि कॅलिफोर्निया राज्यातील आहेत. अमेरिकेतील हे सर्व कोरोनाग्रस्त मूळचे उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती मिळत आहे.
Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज अन्...https://t.co/oR0cVrdSEJ#coronaupdatesindia#Coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) April 9, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा धसका! अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन
Coronavirus : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये पत्नी माहेरी अडकल्याने पतीची आत्महत्या
Coronavirus : मस्तच! Netflix वर आणखी मजा येणार, लॉकडाऊनमध्ये नवं फीचर 'ही' सुविधा देणार
Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर