CoronaVirus: भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:02 PM2020-03-26T16:02:46+5:302020-03-26T16:07:03+5:30

कोरोनामुळे जगभरात २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून कोरोना पसरल्यामुळे जवळपास २०० कोटी लोकांना घरामध्येच कोंडून घ्यावे लागले आहे

CoronaVirus: America, India in recession period; china gets good news: moody's report hrb | CoronaVirus: भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला

CoronaVirus: भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने साऱ्या जगालाच टाळे ठोकावे लागले आहे. अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तानसह युरोमध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे या मोठमोठ्या अर्थव्वस्थांवर मंदीची टांगती तलवार असल्याचा इशारा मूडीजने दिला आहे. 


मूडीजने वर्तविलेल्या अंदाजानुसार जी-२० देशांचा मिळून सकल घरगुती उत्पादन दर म्हणजेच जीडीपी२०२० मध्ये ०.५ टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे अमेरिकी अर्थव्य़वस्थेला दोन टक्के आणि युरो वापरणाऱ्या देशांना २.२ टक्क्यांचा फटका बसणार आहे. मात्र, याचबरोबर चीन हा कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्र असले तरीही अर्थव्यवस्था ३.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 


जी -२० अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, यूरोपीय संघ, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम आणि संयुक्त राज्या अमेरिकेचा समावेश आहे. 
या समूहातील देशांचा जगाच्या जीडीपीच्या ८५ टक्के वाटा आहे. याचबरोबर जागतिक व्यापारामध्येही या देशांचा वाट ८० टक्के आहे. जगातील दोन तृतियांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते. 


कोरोनामुळे जगभरात २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून कोरोना पसरल्यामुळे जवळपास २०० कोटी लोकांना घरामध्येच कोंडून घ्यावे लागले आहे. म्हणजेच जगातील २० टक्के लोकसंख्या घरातच राहत आहे. जवळपास दोन डझन देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. 

गुरुद्वारावर ISIS चा मोठा हल्ला; 27 शीखांचा गोळीबारात मृत्यू

चालता चालता चक्कर येऊन पडला; कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावरच तडफडला

वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी

ISIS बरळली; म्हणाली, 'मूर्तीपूजा करणाऱ्या देशांना अल्लाने उत्तर दिले'

शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक

Web Title: CoronaVirus: America, India in recession period; china gets good news: moody's report hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.