ब्रिटनमध्ये 'अ‍ॅस्ट्राझिनेका'ची लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू; रक्तात गाठी झाल्याची ३० प्रकरणं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:24 PM2021-04-03T20:24:21+5:302021-04-03T20:26:31+5:30

AstraZeneca Vaccine Blood Clots: ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनावरील अ‍ॅस्ट्राझिनेकाची (AstraZeneca Vaccine) लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

coronavirus astrazeneca vaccine seven deaths in britain after blood clots | ब्रिटनमध्ये 'अ‍ॅस्ट्राझिनेका'ची लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू; रक्तात गाठी झाल्याची ३० प्रकरणं समोर

ब्रिटनमध्ये 'अ‍ॅस्ट्राझिनेका'ची लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू; रक्तात गाठी झाल्याची ३० प्रकरणं समोर

Next

AstraZeneca Vaccine Blood Clots: ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनावरील अ‍ॅस्ट्राझिनेकाची (AstraZeneca Vaccine) लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या मृत्यूंचा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीसोबत थेट संबंध असल्याची कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मृत्यू झालेले सातही जणांनी अ‍ॅस्ट्राझिनेकाची लस घेतली होती. युरोपातील देशांनी ऑक्सफर्डच्या लशीवर बंदी घातलेली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आलीय. (Coronavirus Astrazeneca Vaccine Seven Deaths In Britain After Blood Clots)

ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजंसीनं एक पत्रक जारी केलं आहे. "२४ मार्चपर्यंत रक्तात गाठी झाल्याची एकूण ३० प्रकरणं समोर आली आहेत. यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे", असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर नेदरलँड्सनंही अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लसीकरणाला थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे जर्मनीनंही या लशीचा वापर थांबवला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेसोबतच (WHO) युरोपिय मेडिसिन एजन्सीनंही (MEA) अ‍ॅस्ट्राझिनेका लस सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. पण आता या लशीबाबतची महत्वाची माहिती येत्या ७ एप्रिल रोजी एमइएकडून जारी केली जाईल. 

ब्रिटनमध्ये अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या लशीमुळे रक्तात गाठी झाल्याची एकूण ३० प्रकरणं समोर आली आहे. पण देशात आतापर्यंत १.८१ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे लशीचे फायदे जास्त आहेत, अशी माहिती ब्रिटनच्या नियामक संस्थेनं दिली आहे. लस बनविणाऱ्या कंपनीनंही रक्ताची गाठ वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा केला आहे. त्यासोबत अमेरिकेत ही लस ७९ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 

ब्रिटनमध्ये लसीकरण मोहिमेत एकूण ३.१ कोटी डोस देण्याची परवानगी देण्यात आली होती. याअंतर्गत ऑक्सफर्ड-अ‍ॅक्स्ट्राझिनेका आणि फायजरच्या लसीचा वापर करण्यात येणार होता. या दोन लशींपैकी कोणती लस घ्यावी याचा पर्याय निवडण्याचा अधिकार लोकांना नव्हता. जून २०२० मध्ये ब्रिटनने अ‍ॅस्ट्राझिनेकाच्या तब्बल १० कोटी डोसेसची ऑर्डर दिली होती. 

Web Title: coronavirus astrazeneca vaccine seven deaths in britain after blood clots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.