CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:36 PM2021-05-27T17:36:16+5:302021-05-27T17:37:00+5:30

"अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार."

CoronaVirus Biden asked the intelligence community to make more efforts to trace the origins of Covid-19 | CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

CoronaVirus : Wuhan Lab की....? जगभरात कोरोना पसरवणारा गुन्हेगार कोण? मिशन मोडमध्ये अमेरिका!

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी आपल्या गुप्तचर संस्थांना, जगभरात विध्वंस निर्माण करणाऱ्या घातक कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध अधिक गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की 'आता मी, गुप्तचर संस्थांना माहिती एकत्रित करायला आणि तिचे विश्लेषण करण्याचे प्रयत्न अधिक गतीमान करायला सांगितले आहे, जी आपल्याला निर्णायक निष्कर्षांच्या आणखी जवळ नेईल. तसेच त्यांना 90 दिवसांच्या आत रिपोर्ट करायलाही सांगितले आहे.'

बायडेन म्हणाले, त्यांनी रिपोर्टनुसार, आवश्यक तसेच तपासाची क्षेत्रे शोधायला सांगितले आहे. यात चीनसाठी विशेष प्रश्न असतील. ते म्हणाले, 'मी असेही सांगितले आहे, की या प्रयत्नांत आपल्या राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि सरकारच्या इतर संस्थांच्या कामांचाही समावेश व्हायला हवा. जेणेकरून गुप्तचर संस्थांच्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल. याशिवाय, गुप्तचर संस्थांना वेळोवेळी त्याने केलेल्या कामाची काँग्रेसला माहिती देत रहावी,' असेही सांगितले आहे.

धक्कादायक! "पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट", जीव्ही मूर्ती यांचा दावा

अमेरिकाचीनवर दबाव आणतच राहणार - बायडेन
बायडेन यांनी म्हटले आहे, की अमेरिका जगभरात समान विचार ठेवणाऱ्या भागिदारांसोबत काम सुरू ठेवत, चीनवर पूर्ण पारदर्शक तसेच पुराव्यांवर आधारीत आंतरराष्ट्रीय तपासात सामील होण्यासाठी आणि सर्व संबंधित माहिती तथा पुराव्यांपर्यंत पोहोचून, ते उपलब्ध करण्यासाठी दबाव टाकतच राहणार. तत्पूर्वी, 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हायरससंदर्भात माहिती मिळावी आणि अमेरिकेला याचा आणखी प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी बायडेन यांनी रोग नियंत्रण केंद्राला (सीडीसी) चीनपर्यंत पोहोच देण्यास सांगितले होते. 

धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

बायडेन म्हणाले, 'सुरुवातीच्या महिन्यांत आमच्या निरीक्षकांना  ग्राउंडवर जाऊ न देणे, कोरोनाच्या उत्पत्तीसंदर्भातील कुठल्याही प्रकारच्या तपासाला नेहमीच नुकसान पोहोचवेल. असे असतानाही, मार्च महिन्यात मी राष्ट्रपती होताच राष्ट्रीय संरक्षण सल्लागारांना, गुप्तचर संस्थांना करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या सर्वात अद्ययावत विश्लेषणाचा अहवाल तयार करायला सांगितले होते. यात संक्रमित पशूपासून, मानवी संपर्कापासून ते प्रयोगशाळेतील दुर्घटनेने झालेल्या उत्पत्तीपर्यंतच्या तपासाचा समावेश आहे.'

Web Title: CoronaVirus Biden asked the intelligence community to make more efforts to trace the origins of Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.