चिंताजनक! पुढची महामारी असणार जैविक दहशतवादाचा परिणाम, जगाला तयार राहावं लागणार; बिल गेट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:45 PM2021-01-28T14:45:54+5:302021-01-28T14:48:20+5:30
भविष्यातील माहामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना गेट्स यांनी दिली आहे.
(image Credit- gatesnotes)
कोरोनाची माहामारी पसरल्यानंतर अशी अफवा पसरवली होती की, चीननं एक असं हत्यार बनवलं आहे. ज्याच्या वापरानं संपूर्ण जग नष्ट करता येऊ शकतं. आतापर्यंत कोरोनाला एका माहामारीच्या रुपात पाहिलं जात आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा जैविक हत्यारांबाबत धोक्याची सुचना दिली आहे. भविष्यातील माहामारी हा जैविक शस्त्राचा परिणाम असू शकतो. जगाने यासाठी तयार असले पाहिजे. अशी धोक्याची सुचना गेट्स यांनी दिली आहे.
बिल गेट्सने त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ''कोरोना व्हायरस हा अंतिम साथीचा रोग ठरू शकत नाही. ज्याप्रकारे आपण युद्धाची धमकी गांभीर्याने घेतो तसतसे आपण माहामारीसारख्या रोगाशी लढायला आणि गंभीरपणे विचार करण्यास तयार असले पाहिजे. संशोधन आणि विकासासाठी जगाला दुप्पट गुंतवणूक करण्याची गरज आहे.''
त्यांनी पुढे लिहिले की, ''पुढील महामारीसाठी आम्हाला दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करावे लागतील, तरी कोविड -१९ वर खर्च झालेली किंमत २ ट्रिलियन डॉलर आहे. जगाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील जेणेकरुन कोट्यावधी लोकांना मरण्यापासून रोखता येईल.''
दरम्यान बिल गेट्सने यांनी अलिकडेच कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्यांनी ही लस दिल्याबद्दल जगातील सर्व वैज्ञानिक, चाचण्यांमध्ये सहभागी असणारे स्वयंसेवक, फ्रंटलाईन कामगारांचे आभार मानले आहेत. कोरोनाकाळात बिल गेट्स .यांच्याद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या आहेत. एका अहवालात बिल गेट्स यांच्यावर आरोप करण्यात आला होता की ते औषधनिर्माण कंपन्यांशी जोडलेले आहे.Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही
दुसर्या अहवालात असे म्हटले होते की बिल गेट्स कोरोना लसीद्वारे लोकांच्या शरीरात मायक्रोचिप घालू इच्छित आहेत. जेणेकरून व्हायरसच्या स्थितीविषयी अधिक माहिती मिळेल, तथापि गेट्स यांनी नंतर ही माहिती खोटी, अफवा असल्याचे म्हटले आहे. कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा