Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत Covid 19 चा नवा व्हेरिएंट; लसीचा प्रभावही कमी, जाणून घ्या किती धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:45 PM2021-08-30T18:45:44+5:302021-08-30T18:48:15+5:30

संशोधकांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, C.1.2 च्या उपलब्ध असणाऱ्या सीक्वेंसची संख्या दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील विविध फ्रिक्वेंसीचा एक प्रकार असू शकतो.

Coronavirus: C.1.2 New variant of Covid 19 in South Africa; The effect of the vaccine is less | Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत Covid 19 चा नवा व्हेरिएंट; लसीचा प्रभावही कमी, जाणून घ्या किती धोकादायक?

Coronavirus: दक्षिण आफ्रिकेत Covid 19 चा नवा व्हेरिएंट; लसीचा प्रभावही कमी, जाणून घ्या किती धोकादायक?

Next
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेत प्रत्येक महिन्याला C.1.2 जीनोमच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.सुरुवातीच्या काळात देशात बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटसारखं C.1.2 वाढ होत असल्याचं आढळलं.हा नवा व्हेरिएंट जगाची चिंता वाढवू शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली

दक्षिण आफ्रिका आणि जगातील अन्य देशांमध्ये कोरोना व्हायरसचा(Coronavirus) आणखी एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचा धोका आहे. इतकचं नाही तर या व्हेरिएंटमुळे लसीचा काही प्रभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका कायम आहे. दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज(NICD) आणि क्वाजुलु-नेटाल रिसर्च इनोवेशन अँन्ड सीक्वेसिंग प्लॅटफॉर्मच्या संशोधकांनी या वर्षीच्या मेमध्ये देशात पहिल्यांदाच संभाव्य व्हेरिएंट C.1.2 चा शोध लावला आहे.

संशोधनात आढळलं आहे की, C.1.2 चीन, कांगो, मॉरीशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वीझरलंडमध्ये १३ ऑगस्टला सापडला. २४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी MedRxiv वर पोस्ट केलेल्या पीयर रिव्हूय स्टडीनुसार C.1.2 ने C.1 च्या तुलनेत अनेक पटीने विकास केला आहे. ही पूर्वीच्या SARS Cov2 संक्रमणावर आधारित वंशावलीमधली एक आहे. हा नवा व्हेरिएंट जगाची चिंता वाढवू शकतो अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

सावधान! कोरोना लस घेतल्यानंतर ‘Myocarditis’चा धोका; न्यूझीलंडमध्ये पहिलाच मृत्यू

C.1.2 जीनोमच्या संख्येत सातत्याने वाढ

संशोधकांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, C.1.2 च्या उपलब्ध असणाऱ्या सीक्वेंसची संख्या दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील विविध फ्रिक्वेंसीचा एक प्रकार असू शकतो. दक्षिण आफ्रिकेत प्रत्येक महिन्याला C.1.2 जीनोमच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मे महिन्यात जीनोम 0.2 टक्क्याहून वाढवून जूनमध्ये 1.6 टक्के आणि पुन्हा जुलै महिन्यात 2 टक्के झालं असल्याचं स्टडीत आढळलं आहे.

बीटा-डेल्टा व्हेरिएंटसारखाच C.1.2

रिपोर्टमध्ये संशोधकांनी सांगितले आहे की, सुरुवातीच्या काळात देशात बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटसारखं C.1.2 वाढ होत असल्याचं आढळलं. C.1.2 मूळ दरवर्षी 41.8 म्यूटेशन रेट आहे. जो अन्य प्रकारच्या विद्यमान ग्लोबल म्यूटेशन दराच्या तुलनेत दुप्पट आहे. वायरोलॉजिस्ट उपासना रे यांनी म्हटलं की, हा व्हेरिएंट स्पाइक प्रोटिनमध्ये C.1.2 लाइनमध्ये जमलेल्या अनेक म्यूटेशनचा परिणाम आहे जो २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये पुष्टी झालेल्या मूळ व्हायरसपेक्षा वेगळा आहे.

सर्वात जास्त बदलला C.1

C.1 च्या तुलनेत नवा व्हेरिएंट अनेक पटीने म्यूटेट आहे. हा वुहानमध्ये आढळलेल्या कुठल्याही मूळ व्हायरसपेक्षा अधिक म्यूटेट आहे. C.1.2 मध्ये आढळलेल्या ५२ टक्के स्पाइक म्यूटेशन याआधी इतर VOI आणि VOCs मध्ये आढळलं होतं. यातील D614G, सर्व व्हेरिएंटसाठी सामान्य आणि E484K आणि N501Y चा समावेश आहे. जे बीटा आणि गामासोबत मिसळलं होतं. E484K ला ETA मध्ये N501Y हा अल्फा व्हेरिएंटमध्येही आढळून येतो.

Web Title: Coronavirus: C.1.2 New variant of Covid 19 in South Africa; The effect of the vaccine is less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.