Coronavirus: कोरोना विषाणू नैसर्गिकरीतीने विकसित असेल यावर विश्वास ठेवता येणार नाही, डॉ. फौसी यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:54 AM2021-05-24T11:54:29+5:302021-05-24T11:56:58+5:30

Coronavirus News: गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या विषाणूबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत.

Coronavirus: cannot be believed to Coronavirus develop naturally, says Dr. Fauci's big statement | Coronavirus: कोरोना विषाणू नैसर्गिकरीतीने विकसित असेल यावर विश्वास ठेवता येणार नाही, डॉ. फौसी यांचे मोठे विधान

Coronavirus: कोरोना विषाणू नैसर्गिकरीतीने विकसित असेल यावर विश्वास ठेवता येणार नाही, डॉ. फौसी यांचे मोठे विधान

Next

वॉशिंग्टन - गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या विषाणूबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. यादरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर अँथोनी फौसी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. कोरोना विषाणू हा नैसर्गिकरित्या विकसित झाला आहे यावर माझा अद्यापही विश्वास बसलेला नाही. या विषाणूच्या विकसित होण्यामागच्या रहस्यावरून पडदा उठण्यासाठी खुला तपास झाला पाहिजे, अशी शिफारस डॉ. फौसी यांनी केली आहे. (cannot be believed to Coronavirus develop naturally, says Dr. Fauci big statement)

एका मुलाखतीमध्ये डॉक्टर फौसी यांना विचारण्यात आलेकी, कोरोना विषाणू हा नैसर्गिकरीत्या विकसित झाला आहे यावर तुमचा अजूनही विश्वास आहे का? त्यावर उत्तर देताना डॉक्टर फौसी यांनी सांगितले की, नाही, याबाबत माझ्या शंकांचे पूर्णपणे निरसन झालेले नाही. चीनमध्ये नेमके काय झाले, याबाबत आपण तपास करण्याची गरज आहे. कोरोनाचा नेमका उगम कुठून झाला. तो कुठून आला याबाबत माहिती मिळत नाही. तोपर्यंत या प्रकरणात आपण माघार घेता कामा नये.

फॉक्स न्यूजने दिलेल्या एका वृत्तामध्ये फौसींच्या हवाल्याने सांगितले की, निश्चितपणे ज्या लोकांनी याचा तपास केला. त्यांचे म्हणणे आहे की हा विषाणू कदाचित एखाद्या प्राण्यामधून आला असावा. त्याचा नंतर माणसांना संसर्ग झाला. मात्र हे काही वेगळेही असू शकते. याबाबत माहिती घेण्याची गरज आहे. त्यामुळेच मी याबाबतीत अधिक तपास होण्याची गरज असल्याचे सांगतो. त्यामधून हा कोरोना विषाणू कुठून आला हे समजू शकेल. 

कोरोनाबाबत चीनमध्ये जे काही झाले. त्याचा तपास होण्याची गरज असल्याचे सांगत डॉक्टर फौसी म्हणाले की, चीनने जे काही केले त्याचा माझ्याकडे काही हिशोब नाही आहे. मी तपासाच्या बाजूने आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यातील आपल्या रिपोर्टमध्ये कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेतून बाहेर आलेला नाही, असे सांगितले. दरम्यान, स्टँनफोर्डमध्ये मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डेव्हिड रेलमन यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी सायन्स जर्नलमध्ये सांगितले की, हा विषाणू कुठलीतरी प्रयोगशाळा आणि जेनेटिक स्पिलओव्हर या दोन्ही माध्यमातून अचानक बाहेर पडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Coronavirus: cannot be believed to Coronavirus develop naturally, says Dr. Fauci's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.