Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 08:58 AM2021-05-01T08:58:31+5:302021-05-01T09:03:48+5:30
गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्या. चीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव.
गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, अनेक देशांनी पुढे येत भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चीननंदेखील आता भारताला मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. भारतातील चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
चीन भारताबरोबर महासाथीच्या विरोधात सहकार्य मजबूत करण्यास आणि देशाला पाठबळ व सहकार्य देण्यासाठी तयार असल्याचं जिनपिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोरोनाच्या महासाथीविरोधात लढण्यासाठी चीन भारताला हवी ती मदत करण्यास तयार आहे. तसंच चीनमध्ये तयार करण्यात आलेली महासाथीच्या विरोधातील सामग्री जलदगतीनं भारताला पोहोचवली जात आहे, असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी यांनी गुरुवारी म्हटलं होतं.
Chinese President #XiJinping sends a message of sympathy to Indian Prime Minister Narendra Modi @narendramodi today.
— Sun Weidong (@China_Amb_India) April 30, 2021
President Xi says, "I am very concerned about the recent situation of COVID-19 pandemic in India. On behalf of the Chinese Government and people, as well as in my own name, I would like to express sincere sympathies to the Indian Government and people."
— Sun Weidong (@China_Amb_India) April 30, 2021
"भारत ज्या आव्हानांचा सामना करत आहे त्याप्रती चीन संवेदना व्यक्त करतो आणि त्याबद्दल सहानुभूतीही आहे," असं वांग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. "कोरोना विषाणू हा मानवाचा शत्रू आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्क होऊन याचा सामना करण्याची गरज आहे. चीन भारत सरकार आणि तेथील नागरिकांचं महासाथीच्या लढाईत सोबत आहे," असं चीनचे राजदूत सुन वेईदोंग यांनी ट्विटरवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.