चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:16 PM2021-01-19T14:16:20+5:302021-01-19T14:22:09+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

coronavirus cases in world corona crisis in world china who | चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा 

चीन आणि WHO ला कोरोना रोखणं होतं शक्य, वाचला असता लाखो लोकांचा जीव पण...; रिपोर्टमधून मोठा खुलासा 

Next

जगभरातील सर्वच देश हे कोरोना संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा कठोर नियम हे लागू करण्यात येत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 96,029,459 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2,049,957 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. असाच एक धक्कादायक खुलासा हा रिसर्चमधून करण्यात आला आहे. चीन आणि WHO ने ठरवलं असतं तर कोरोनाला रोखता आलं असतं असा खुलासा करण्यात आला आहे. 

चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलं असतं तर लाखो लोकांचा जीव वाचवता आला असता असं इंडिपेंडेंट पॅनल फॉर पॅन्डामिक प्रिपेयर्डनेस अँड रिस्पॉन्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. स्वतंत्र पॅनेलने जाहीर केलेल्या या रिपोर्टमध्ये चीनने जर ठरवलं असतं असल्यास कोरोना व्हायरसचा जगभरात होत असलेला प्रसार रोखू शकला असता, मात्र तसं झालं नाही. तसेच यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला देखील जबाबदार धरण्यात आलं आहे कारण जेव्हा कोरोना व्हायरसची पहिली घटना चीनमध्ये नोंदली गेली तेव्हा जागतिक आरोग्य संघटना बीजिंगबरोबर त्याचा खात्मा करण्यासाठी एकत्र काम करू शकली असती. मात्र आज संपूर्ण जगाला त्याचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलं आहे. 

कोरोनाबाबतच्या या निष्काळजीपणामध्ये केवळ चीनच नाही तर WHO सुद्धा समान भागीदार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जर या दोघांनी सुरुवातीलाच वेगाने कार्य केलं असतं आणि जगभरात जनजागृती केली असती तर आज लाखो लोकांचे जीव वाचू शकतात. रिपोर्टमध्ये जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. 

आता गांजा वाचवू शकतो कोरोनाग्रस्तांचा जीव, रिसर्चमधून दावा

जगभरातील संशोधक कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाचा खात्मा करण्यासाठी कोणतं औषध परिणामकारक ठरेल याचा शोध घेत आहे. याच दरम्यान कॅनडामधील एका विद्यापीठाने एक कोरोनाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना गांजाचा वापर करून वाचवता येऊ शकतं असा दावा केला आहे. या रिसर्चनुसार शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखी सक्षम करण्यासाठी गांजाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. कोरोना तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींवर गांजाचा अंश असणाऱ्या औषधांचा वापर करण्यास सुरुवात करता येईल असा खुलासा संशोधकांनी केला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे.

 

Web Title: coronavirus cases in world corona crisis in world china who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.