Coronavirus : निर्लज्जपणाचा कळस! कारमध्ये सेक्स करताना रंगेहाथ पकडलं, लॉकडाऊनदरम्यान कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:29 IST2020-03-23T19:26:31+5:302020-03-23T19:29:49+5:30
देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना दुसरीकडे अशी विचित्र बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Coronavirus : निर्लज्जपणाचा कळस! कारमध्ये सेक्स करताना रंगेहाथ पकडलं, लॉकडाऊनदरम्यान कारवाई
इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत अंदाजे ५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कारमध्ये सेक्स करत असताना एका जोडप्याला पोलिसांनीअटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना मिलान शहरात घडली आहे. पोलिसांनी २३ वर्षीय इजिप्शियन तरुण आणि ४० वर्षीय ट्युनिशियन महिला यांना सोमवारी मिलानच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
एएनएसएने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्यावर क्वारंटाइन नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. इटालियन नागरिकांना केवळ अन्न विकत घेण्याची, वैद्यकीय सेवा देण्याची किंवा अगदी आवश्यक असल्यास कामासाठी प्रवास करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, जगभरात इतकी तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना या जोडप्याने तर हद्दच पार केली आणि चक्क कारमध्ये सेक्स करताना पोलिसांना आढळले.
इतरत्र, लॉनवर विश्रांती घेत असलेल्या एका कुटुंबाला आज मिलान जवळील सॅन डोनाटो मिलानीस येथे पोलिसांनी हलविण्याचे आदेश दिले. मिलान हे शहर करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लॉम्बार्डी प्रांतामध्ये आहे. इटलीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तेथील प्रशासन आणि रुग्णालये याचा सामना करण्यासाठी झटत आहेत. मात्र, त्यातच ही विचित्र घटना घडली आहे. देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना दुसरीकडे अशी विचित्र बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या दोघांवर नक्की पुढे काय कारवाई करण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही, असं डेली मेल युकेने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे. इटलीमध्ये वाहनांवर पोलिसांची करडी नजर असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, कोरोनाशी झटत असतं या जोडप्याने केलेल्या कृत्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे.