CoronaVirus: चीनने पाकिस्तानला गंडवले; कोरोनापासून वाचण्यासाठी 'हे' काय पाठवले?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 04:42 PM2020-04-04T16:42:07+5:302020-04-04T16:42:58+5:30
coronavirus मित्र राष्ट्र पाकिस्तानची चीनकडून मोठी फसवणूक
चीननेपाकिस्तानला गंडवले; अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवले
इस्लामाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तानची मित्र राष्ट्र चीननं मोठी फसवणूक केली आहे. पाकिस्तानला वैद्यकीय मदत पाठवण्याचं आश्वासन चीननं दिलं होतं. मात्र चीननं पाठवलेले वैद्यकीय साहित्याचे खोके उघडून पाहिल्यानंतर पाकिस्तानला धक्का बसला. चीननं एन-९५ च्या मास्कऐवजी अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाकिस्तानला पाठवले आहेत. चीन पाठवत असलेले मास्क निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी अनेक युरोपियन देशांनी याआधी केल्या आहेत. स्पेन आणि नेदरलँडनं चीनकडून पाठवण्यात आलेलं वैद्यकीय साहित्य नाकारलं होतं.
कोरोनापासून रक्षण करण्यासाठी एन-९५ मास्क पाठवण्याचं आश्वासन काही दिवसांपूर्वी चीननं पाकिस्तानला दिलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीननं जरा जास्तच गुणगान गात होते. मात्र सध्या तरी या गुणगानाचा कोणताही फायदा पाकिस्तानला होताना दिसत नाही. चीनने पाठवलेली मदत पाहून पाकिस्तानच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. चीननं अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवल्यानं रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे सिंध प्रांतातल्या सरकारनं कोणतीही तपासणी करता चीनकडून आलेली वैद्यकीय मदत थेट रुग्णालयांमध्ये पाठवून दिली.
वैद्यकीय मदत पाठवण्यासाठी गिलगिट-बाल्टिस्तानची सीमा उघडण्यात यावी, असं याआधी चीननं म्हटलं होतं. शिजियांग प्रांतातून वैद्यकीय मदत पाठवायची असल्याचं चीनच्या दुतावासानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला सांगितलं होतं. चीननं स्वत:हून मदत देण्याची तयारी दर्शवल्यानं पाकिस्तान सरकार अतिशय आनंदात होतं. मात्र अंडरवेअरपासून तयार करण्यात आलेले मास्क पाठवण्यात आल्यानं त्यांच्या या आनंदावर विरजण पडलं.