CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 17:44 IST2020-05-24T17:41:42+5:302020-05-24T17:44:08+5:30
WHO च्या परिषदेमध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने अशा तपासाची मागणी लावून धरली होती. यावेळी जिनपिंग यांनी कोरोनाची लाट संपल्यानंतर चीन चौकशीला तयार असल्याचे म्हटले होते.

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला
बिजिंग : कोरोना व्हायरसमुळे अवघे जग त्रस्त झाले आहे. त्यातच नेहमी कुरापती काढणाऱ्या चीनमधून हा व्हायरस आल्य़ाने जगभरातील देश आणखीनच संतप्त झाले आहेत. या चीनची चौकशी करण्याची मागणी अमेरिकेसह अन्य देश करत होते. मात्र, चीनने ही मागणी वेळोवेळी फेटाळून लावत अमेरिकेच्य़ा चौकशी पथकाला देखील नकार दिला होता. मात्र, जगाच्या रेट्यासमोर चीन नरमला आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले की, चीन कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीसंबंधातील आंतरराष्ट्रीय चौकशीला तयार आहे. मात्र, या चौकशीमध्ये राजकीय हस्तक्षेप असता नये अशी अट घातली आहे. याचाच अर्थ चीनला अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चिंता सतावत आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न झाला. अफवा पसरविण्याचे अमेरिकेटचे प्रयत्न फसले, असे वांग यांनी ट्रम्प यांच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले. WHO च्या परिषदेमध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने अशा तपासाची मागणी लावून धरली होती. यावेळी जिनपिंग यांनी कोरोनाची लाट संपल्यानंतर चीन चौकशीला तयार असल्याचे म्हटले होते.
या पार्श्वभुमीवर वांग यी यांनी वार्षिक संसद सत्राच्या वेळी सांगितले की, चीन व्हायरसच्या स्रोतांची तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या संघटनेसोबत काम करण्यासाठी तयार आहे. आम्हाला असे वाटते की ही तपासणी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, निष्पक्ष आणि रचनात्मक व्हावी. निष्पक्ष म्हणजे राजनैतिक हस्तक्षेपापासून मुक्त हवी. सर्व देशांच्या सर्वभौमत्वाचा सन्मान व्हायला हवा. तसेच अंदाजाच्या आधारे कोणालाही गुन्हेगार ठरविण्याला विरोध व्हायला हवा.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात
व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली
CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती
Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू
खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र