CoronaVirus कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 02:00 PM2020-04-28T14:00:49+5:302020-04-28T14:03:57+5:30
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे.
वॉशिंग्टन : चीनने हेतूपुरस्सर कोरोना व्हायरसची माहिती जगापासून लपवून ठेवल्याने जगभरात कोरोना पसरला आणि आर्थिक नुकसानीबरोबर लाखो जीव गेल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. यावरून चीनी व्हायरस संबोधल्याने दोन देशांमध्ये वाक् युद्धही रंगले होते. आता या युद्धाने सायबर हल्ल्यांपर्यंत मजल मारली असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थांवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. यमुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मासिटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजवर दररोज सायबर हल्ले होऊ लागले आहेत. जगात दोन जागा अशा आहेत की या डिपार्टमेंटवर अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. त्यापैकी चीनवर आमचा संशय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरा देश रशिया असे या अधिकाऱ्याला अप्रत्यक्षपणे म्हणायचे होते.
डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार चीनी हॅकरांना अमेरिकेच्या हॉस्पिटल आणि लॅबवर हल्ला करायचा आहे. याची चिंता प्रशासनाला आहे. जॉन डेमर या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोना व्हायरसच्या लसीवर बायोमेडिकल संशोधन सुरु आहे. त्याशिवाय आता काही कोणत्यारही देशाला महत्वाचे नाहीय. जो देश या महामारीचे रामबाण औषध शोधून काढेल त्याची इतिहासात मोठी नोंद होणार आहे. यामुळे चीन यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. त्या देशाच्या यशाचे गुणगाण जगभर गायले जाणार आहे.
गेल्या महिन्यात सायबर सिक्युरिटी ग्रिप फायर आय नुसार चीनच्या APT41 ग्रुपनेब्रॉडकास्ट कँपेन चालविले होते. अमेरिका आधीपासूनच चीन, रशिया, ईरान आणि उत्तर कोपियावर सायबर हल्ले केल्याचे आरोप लावत आला आहे.
अन्य बातम्या वाचा...
CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक
यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन
एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले
दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज