Coronavirus: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:07 AM2020-04-03T10:07:59+5:302020-04-03T10:10:36+5:30

कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २० अँटीबॉडीजची ओळख करुन दिली आहे. यातील  चार अँटीबॉडी कोरोनाविरूद्ध प्रभावीपणे कार्य करत असल्याचं दिसून आलं आहे

Coronavirus: China's search unique way to fight Coronavirus; Thousands of patients recovered pnm | Coronavirus: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!

Coronavirus: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!

Next
ठळक मुद्देचीनमध्ये या कोरोना विषाणूमुळे ३ हजार ३२२ लोक मरण पावले आहेत.कोरोनातून जवळपास ७६ हजार ५६६ लोकांवर उपचार करण्यात चीनला यश यामुळे व्हायरसचा शरीरात संसर्ग पसरत नाही आणि त्यावर उपचार करणे सोपे होते.

नवी दिल्ली – जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसने आपल्या जाळ्यात ओढलं आहे. तर ५० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरिने तयारी करत आहे. कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगातील संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र यातच चीनने शॉर्टकट शोधला आहे.

चीनने अँटीबॉडीज तयार करण्यास सुरुवात केली आहे, या अँटीबॉडीज कोरोना व्हायरससाठी सर्वात अचूक आणि प्रभावी उपचार असल्याचं सिद्ध होत आहेत. यामुळे चीनने हजारो रुग्णांना बरे केल्याचा दावा चीनने केला आहे. चिनी वैज्ञानिक झांग लिनकीच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू केवळ रक्तातल्या पेशीमध्ये प्रवेश करूनच हल्ला करतो. त्याला रोखण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी अँटीबॉडीज तयार केल्या आहेत जे व्हायरसला पेशीमध्ये प्रवेश करू देत नाहीत. यामुळे व्हायरसचा शरीरात संसर्ग पसरत नाही आणि त्यावर उपचार करणे सोपे होते.

कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २० अँटीबॉडीजची ओळख करुन दिली आहे. यातील  चार अँटीबॉडी कोरोनाविरूद्ध प्रभावीपणे कार्य करत असल्याचं दिसून आलं आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर पसरला आहे. चीनमध्ये ८२ हजार ४३७ लोकांना या विषाणूची लागण झाली. परंतु चीन सरकारने या साथीच्या रोगातून जवळपास ७६ हजार ५६६ लोकांवर उपचार करण्यात यश मिळवलं. या काळात चीनमध्ये या कोरोना विषाणूमुळे ३ हजार ३२२ लोक मरण पावले आहेत.

सध्या जगातील सर्व शास्त्रज्ञ कोरोना विषाणूच्या जीनोम क्रमानुसार याला संपुष्टात आणण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याउलट, चीनी शास्त्रज्ञांनी प्रथम हा व्हायरस पसरतो कसा? याबाबत शोध घेतला. कोरोना विषाणू शरीरात घुसून हल्ला करण्यास सुरुवात करतो हे समजल्यानंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार केल्या. जगातील सर्व वैज्ञानिकांना हे ठाऊक आहे की लस तयार करण्यास एक ते दोन वर्षे लागू शकतात. म्हणूनच चिनी शास्त्रज्ञांनी व्हायरसला पेशीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचे काम केले. यात त्यांना जबरदस्त यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. जगभरात अँटीबॉडीजपासून आजार बरा करण्याची पद्धत खूप जुनी आहे. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर केवळ कर्करोग, रक्तामधील आजार, संक्रमण आणि रोग प्रतिकारशक्तीशी संबंधित रोगांमध्ये अँटीबॉडीजचा वापर करतात.

Web Title: Coronavirus: China's search unique way to fight Coronavirus; Thousands of patients recovered pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.