चीनचे पाप जगाला भोगावे लागतेय; डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:04 PM2020-03-20T12:04:23+5:302020-03-20T12:09:03+5:30

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये महासत्ता बनण्यावरून नेहमीच शीतयुद्ध होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे संबंध ताणले गेलेले होते. आता त्यात कोरोना व्हायरसची भर पडली आहे.

Coronavirus: China's sin, the whole world has to suffer hrb; Donald Trump's U-Turn | चीनचे पाप जगाला भोगावे लागतेय; डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न

चीनचे पाप जगाला भोगावे लागतेय; डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न

Next

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने जगावर शट डाऊन करण्याची वेळ आणली आहे. अमेरिकेमध्ये तर मंदीची घोषणाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना करावी लागली आहे. जगभरात आतापर्यंत दहा हजाराच्या वर मृत्यू झाले असून हे पाप चीनचेच असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीनी व्हायरस अशी टीका केल्यानंतर चीन खवळला होता. आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये महासत्ता बनण्यावरून नेहमीच शीतयुद्ध होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे संबंध ताणले गेलेले होते. आता त्यात कोरोना व्हायरसची भर पडली आहे. कोरोनाने अमेरिका, युरोपला चांगलेच नामोहरम केले आहे. या व्हायरसची उत्पत्ती झालेल्या चीनमध्ये हा व्हायरसचा उद्रेक आटोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप केला आहे.

ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस असे हिणविले आहे. जग चीनच्या कर्माची फळे भोगत आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे. चीनने योग्य वेळीच कोरोना व्हायरसची माहिती दिली असती तर चीनमध्येच त्याला रोखता आले असते. त्यांनी सूचना न दिल्याने जगावर ही वेळ आल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेमध्ये आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून सैन्यालाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी व्हायरस संक्रमणावर ताबा मिळविल्याने चीनची स्तुती केली होती. मात्र, आता या व्हायरसमुळे अमेरिकेमध्ये हाहाकार उडाल्यामुळे ते संतापले आहेत. यामुळे ट्रम्पच कोरोनाला चीनी व्हायरस नावाने संबोधत आहेत. अमेरिकेमध्ये १४००० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

सर्वाधिक संक्रमित सहावा देश

 अमेरिका हा कोरोनाचा प्रकोप झालेला सहावा सर्वात मोठा देश ठरला आहे. आता चीनला मागेटाकत इटली सर्वाधिक कोरोना बळींचा देश ठरला आहे. अमेरिकेमध्ये २१८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये १ लाखावर लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

Madhya Pradesh Crisis : बंडखोर आमदाराच्या मुलीची आत्महत्या; गळफास लावून घेतला

राजकारण आम्हालाही करता येते, पण...!; रोहित पवारांनी डावखरेंना झापले

Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

Web Title: Coronavirus: China's sin, the whole world has to suffer hrb; Donald Trump's U-Turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.