CoronaVirus: रशियाकडून कोरोना लसीच्या उत्पादनास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:39 AM2020-08-16T02:39:30+5:302020-08-16T06:44:44+5:30
रशियाने कोरोनावरील लसीच्या उत्पादनास सुुरुवात केली असल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे.
मॉस्को : रशियाने कोरोनावरील लसीच्या उत्पादनास सुुरुवात केली असल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिले आहे. मॉस्कोमधील गॅमालिया संस्थेमध्ये ही लस विकसित केली असून त्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. या महिनाअखेर ती बाजारात येईल.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केली असल्याची घोषणा केली आहे. मात्र जगातील वैज्ञानिकांनी या लसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात आलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दुसºया आणि तिसºया टप्प्यानंतर लस योग्य आहे किंवा नाही याची माहिती कळू शकते असेही जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ही लस देण्यासाठी रशियाने वयाची अट घातलेली आहे. १८ वर्षापेक्षा कमी आणि ६० हून अधिक वय असलेल्यांना देता येणार नाही असेही रशियाने स्पष्ट केले आहे.