Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 08:03 AM2020-04-23T08:03:28+5:302020-04-23T08:14:53+5:30

Coronavirus : अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,637,673 over 184,217 died SSS | Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. देशासह जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे 1486 नवे रुग्ण आढळले असून, याच काळात 49 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 21 हजार 370 झाली असून, त्यापैकी 4370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेसाठी देशातून लाखो भाविक जात असतात. तर दुसरीकडे जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे.

जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 848,994 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 187,327 वर गेली आहे. तर तब्बल 25,085 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 21,717 वर गेली आहे. कोरोनामुळे  चीनमध्ये 4,632, स्पेनमध्ये 21,717, इराणमध्ये 5,391, फ्रान्समध्ये 21,340, जर्मनीमध्ये 5,315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारत कोरोनाचा सामना करत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असं मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

CoronaVirus infection speed is not doubled says Health Ministry | CoronaVirus: कोरोना प्रसाराचा वेग देशात दुप्पट नाही; आरोग्य मंत्रालयाचा दावा

भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू दिली नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. देशात दररोज रुग्ण वाढत असले तरी त्यात चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांसारखी मोठी वाढ नाही.देशात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या वीस हजारांवर गेली होती. दररोज रुग्णांमधे वाढ होत आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स,  ब्रिटन, चीन, इराण, तुर्की, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, नेदरलँड, स्वित्झर्लंड, रशिया, पोर्तुगाल, आयर्लंड आणि इस्राईलमधे ज्या पद्धतीने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्या प्रमाणात भारतात झाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: कोरोना प्रसाराचा वेग देशात दुप्पट नाही; आरोग्य मंत्रालयाचा दावा

CorornaVirus: देशात १४८६ जणांची भर; कोरोना रुग्णांची संख्या २१,३७० वर

 

Web Title: coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,637,673 over 184,217 died SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.