Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 11:36 AM2020-04-02T11:36:42+5:302020-04-02T11:38:56+5:30
Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 47,249 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 47,249 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 9,36,204 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,94,578 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसनं कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 13,155 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 110,574 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 9,387 वर गेली आहे.
कोरोनामुळे चीनमध्ये 3,312, अमेरिकेत 5,110, स्पेनमध्ये 9,387, इराणमध्ये 3,036, फ्रान्समध्ये 4,032, जर्मनीमध्ये 931 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1900 हून अधिक झाली आहे. तर दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा दोन लाखांहून अधिक झाला आहे.
Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...https://t.co/oZ15SrBHQl#CoronaLockdown#Coronaindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 2, 2020
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अमेरिकेमध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सुमारे 26 हजार 473 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या दोन लाखांच्यावर पोहोचली आहे. तर एका दिवसात 1 हजार 49 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...
Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू
Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त
coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद