Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 03:18 PM2020-04-15T15:18:42+5:302020-04-15T15:35:32+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 26,064बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

coronavirus confirmed cases covid19 worldwide exceed 2008164 over 127147 died SSS | Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

googlenewsNext

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,27,147 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 20,08,164 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 4,86,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. 

कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 26,064बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 21 हजार, 67 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 18 हजार 255 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 15 हजार, 729 जणांचा तर ब्रिटनमध्ये 12 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 486,247  जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 486,247 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

भारतात एका दिवसात 141 हून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तसेच कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : वायू दुर्घटनेतून बचावले; पण 'त्या' 5 जणांना कोरोनाने गाठले

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक

Coronavirus : दिलासादायक! देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी केली कोरोनावर मात 

Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

 

Web Title: coronavirus confirmed cases covid19 worldwide exceed 2008164 over 127147 died SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.