Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचला कोरोना, व्हाइट हाऊसमधला अधिकारी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:07 AM2020-03-21T09:07:40+5:302020-03-21T09:10:17+5:30

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना संक्रमित असल्याचं उघड झालं आहे.

Coronavirus : Corona arrives at US President's Office, White House official covid 19 positive vrd | Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचला कोरोना, व्हाइट हाऊसमधला अधिकारी पॉझिटिव्ह

Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचला कोरोना, व्हाइट हाऊसमधला अधिकारी पॉझिटिव्ह

Next

वॉशिंग्टनः जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. कोरोना व्हायरसनं आतापर्यंत जगभरात 269911 संक्रमित असून, एकट्या अमेरिकेतच 16 हजारांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. तसेच अमेरिकेत 225 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना व्हायरस हा सामान्यांपर्यंत मर्यादित न राहता आता अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन पोहोचला आहे. व्हाइट हाऊसमधला एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना संक्रमित असल्याचं उघड झालं आहे.

या वृत्तानंतर व्हाइट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. आता तो अधिकारी व्हाइट हाऊसमधल्या कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता, त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीच्या संपर्कात नाहीत. काल संध्याकाळी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचा कार्यालयातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती उपराष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिव कॅटी मिलर यांनी दिली आहे. आता आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार ही व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात आलेली होती, याची माहिती घेतली जात आहे. 

व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशासाठी कडक नियमावली
व्हाइट हाऊस परिसरात प्रवेश करण्यासाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉक्टरांची टीम आणि सीक्रेट सर्व्हिस एजंट हरेक व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करूनच त्यांना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश देत आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस ब्रीफिंग रूममधल्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. जेणेकरून दोन व्यक्तींच्या बसण्यात काही अंतर राखलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

Web Title: Coronavirus : Corona arrives at US President's Office, White House official covid 19 positive vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.