Coronavirus: धक्कादायक! मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:03 PM2020-05-13T12:03:52+5:302020-05-13T12:05:59+5:30

गार्डियनच्या म्हणण्यानुसार, स्पाइक (एस) प्रथिनेशी संबंधित दोन मोठे बदल पाहिले गेले आहेत. यातील एका बदलामुळे इटलीमध्ये विनाश झाला.

Coronavirus: The corona is constantly changing itself to hide in the human body pnm | Coronavirus: धक्कादायक! मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांना चिंता

Coronavirus: धक्कादायक! मानवी शरीरात लपण्यासाठी कोरोनामध्ये होतोय सातत्याने बदल; वैज्ञानिकांना चिंता

Next
ठळक मुद्देजगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी कोरोनाच्या जीनोम क्रमांवर नजर ठेवून आहेतकोरोना विषाणू मानवी शरीरात लपून बसण्यासाठी वेगवेगळी युक्ती करत आहेकोरोना विषाणू प्रत्येक देशात आणि परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये काही बदल करीत आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरात लस बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावर उपचार करण्यासाठी नवीन औषधांसह वापरातील औषधांची चाचणी सुरू आहे. मात्र कोरोना जीनोमविषयी जी माहिती मिळत आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व एजन्सींना धक्का पोहचला आहे. जगातील ६२ देशात या विषाणूच्या ५,३०० जीनोमच्या विश्लेषणामुळे सर्व आश्चर्यचकित झाले आहेत.

गार्डियनच्या म्हणण्यानुसार, स्पाइक (एस) प्रथिनेशी संबंधित दोन मोठे बदल पाहिले गेले आहेत. यातील एका बदलामुळे इटलीमध्ये विनाश झाला. आता वैज्ञानिक चेतावणी देतात की, कोरोना विषाणू मानवी शरीरात लपून बसण्यासाठी वेगवेगळी युक्ती करत आहे. त्यासाठी तो सातत्याने स्वत:मध्ये बदल करत असल्याचं दिसून येते. अशातच कोणत्याही लसीमुळे कोरोनाच्या जीनोम अनुक्रमातील कोणत्याही बदलांचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे असं त्यांनी सांगितले.

जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी कोरोनाच्या जीनोम क्रमांवर नजर ठेवून आहेत. त्यांची नजर एस प्रोटीनवर आहे. त्याच्या शक्तिशाली स्पाइकमुळे, तो मानवी शरीरात राहू शकतो. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, २००२ मध्ये कोरोना व्हायरस कुटुंबामुळेच सार्स पसरला, परंतु त्याचे स्पाइक्स इतके शक्तिशाली नव्हते. त्यामुळे वैज्ञानिकांना कोविड -१९ ची शक्ती दूर करायची आहे, ज्यानंतर ते एक अगदी किरकोळ व्हायरस होईल.

कोरोना विषाणू प्रत्येक देशात आणि परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये काही बदल करीत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना जीनोममध्ये ५२ अनुक्रम ओळखली गेली आहेत. त्याचप्रमाणे, इतर देशांमध्ये त्याच्या जीनोम क्रमात हजारो छोटे बदल घडून आले आहेत. तथापि, कोविड -१९ विषाणूचे मूळ चीनपासून २०२ देशांमध्ये पसरले आहे. जीनोम क्रमांची संख्या दहा हजारांच्या पलीकडे जाऊ शकते अशी भीती वैज्ञानिकांना आहे.

कोरोना विषाणू २९,९०३ न्यूक्लियोडाईट्स (सेंद्रिय पदार्थ) किंवा न्यूक्लियस बेसपासून बनलेला आहे. कोरोनाच्या बाहेर फनेल सारखे सेन्सर आहेत ज्याला स्पाइक (एस) प्रथिने म्हणतात. ही त्याची मूलभूत रचना आहे, आत तो सतत बदलत असतो. विचार करा, २९ हजार पेक्षा जास्त विटांनी बनविलेले घर बनवलं जातं त्याचा मूळ ढाचा बाहेरुन एकसारखा असतो पण आतमध्ये बदल करु शकतो. त्याचप्रमाणे कोरोना आतमधून सतत बदल करत आहे. त्यालाच जीनोम अनुक्रम म्हणतात.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाच्या संकटातही रोजगाराची संधी; यंदाही करणार कंपन्या नियुक्ती पण...

जाणून घ्या, चीनला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखला ‘लोकल-व्होकल’चा डाव!

देशाच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही मोठं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २० लाख कोटींचं महापॅकेज!

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

२० लाख कोटींमध्ये किती शून्य येतात?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

Web Title: Coronavirus: The corona is constantly changing itself to hide in the human body pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.