Coronavirus: कोरोना संकटात गाईला मिठी मारल्याने मिळतेय मानसिक शांती? अमेरिकन खर्च करतायेत प्रतितास १४,५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:13 PM2021-05-24T13:13:57+5:302021-05-24T13:15:06+5:30

अमेरिका आणि युरोपमध्ये अनोखा पर्याय शोधून काढला आहे. लोक मानसिक शांतीसाठी गाईला मिठी मारत आहे.

Coronavirus: Corona crisis gives you peace of mind by hugging a cow? Americans spend 200 Dollar | Coronavirus: कोरोना संकटात गाईला मिठी मारल्याने मिळतेय मानसिक शांती? अमेरिकन खर्च करतायेत प्रतितास १४,५०० रुपये

Coronavirus: कोरोना संकटात गाईला मिठी मारल्याने मिळतेय मानसिक शांती? अमेरिकन खर्च करतायेत प्रतितास १४,५०० रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देगाईला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असं नाही तर यामुळे निरोगी राहण्यासही खूप फायदा एक मिठी हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचं काम करतं. शरीरात मेटाबोलिझम, इम्युनिटी आणि तणाव यांच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करते.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने जगासह भारतातही बिकट अवस्था केली आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश सरकारने कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावत लोकांना घरातच राहण्याची सक्ती केली आहे. अशावेळी लोकांवर मानसिक तणाव आला आहे. हा मानसिक तणाव दूर करण्याचा प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत.

अमेरिका आणि युरोपमध्ये अनोखा पर्याय शोधून काढला आहे. लोक मानसिक शांतीसाठी गाईला मिठी मारत आहे. त्यासाठी अनेकजण २०० डॉलरपर्यंत पैसेही देत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अमेरिकेतील लोक गाईला मिठी मारण्यासाठी प्रति तास २०० डॉलरपर्यंत म्हणजे १४,५०० रुपये खर्च करत आहेत. भारतात गाईंना सर्वश्रेष्ठ मानलं जातं. हजारोवर्षापासून गाईंची पूजा केली जाते.

काय आहे यामागचं कारण?

गाईला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असं नाही तर यामुळे निरोगी राहण्यासही खूप फायदा होत असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात गाईला गोंजारणं आणि तिला कवेत घेणे ही जुनी परंपरा आहे. आता जगात सध्या हा ट्रेंड बनला आहे.

डॉक्टर काय म्हणतात ?

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गाईला मिठी मारल्यानं घरात एका लहान मुलाला आणि पाळीव प्राण्याला पाळल्याची जाणीव होते. एक मिठी हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचं काम करतं. कोर्टिसोल कमी करतं. त्यासोबत तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाचं लक्षणही यामुळे कमी होत असल्याचं डॉक्टर सांगतात.

Cow Hug नं इम्युनिटी वाढते

गाईचा स्वभाव शांत, कोमल आणि ध्यैर्यवान आहे. गळाभेट करणाऱ्याच्या शरीराचं तापमान, ह्दयाची गती आणि मोठ्या आकाराचा फायदा होता. हे सर्व शरीरात मेटाबोलिझम, इम्युनिटी आणि तणाव यांच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करते.

Web Title: Coronavirus: Corona crisis gives you peace of mind by hugging a cow? Americans spend 200 Dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.