CoronaVirus : कोरोनाचे जगभरात २२ हजारांवर बळी; इटली, स्पेन, चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:27 AM2020-03-27T02:27:11+5:302020-03-27T05:41:56+5:30

CoronaVirus : भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या वर असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या मात्र त्यामानाने खूपच कमी म्हणजे ८०० च्या घरात आहे. योग्य उपचारांमुळे रुग्णही बरे होत आहे.

CoronaVirus: Corona victims over 22,000 worldwide; Most deaths in Italy, Spain, China | CoronaVirus : कोरोनाचे जगभरात २२ हजारांवर बळी; इटली, स्पेन, चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू 

CoronaVirus : कोरोनाचे जगभरात २२ हजारांवर बळी; इटली, स्पेन, चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू 

Next

जिनिव्हा : तब्बल १९८ देशांमध्ये हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात २२ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ९० हजार लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. मात्र, त्यापैकी १ लाख १८ हजार लोक बरे झाले आहेत, ही त्यातील सर्वात दिलासादायक बाब आहे.
भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या वर असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या मात्र त्यामानाने खूपच कमी म्हणजे ८०० च्या घरात आहे. योग्य उपचारांमुळे रुग्णही बरे होत आहे. चीनमधून हा आजार जगभर पसरला असला तरी सर्वाधिक साडेसात हजारांपेक्षा अधिक लोकांचे बळी इटलीत गेले आहेत.

युरोपात पुन्हा नवे रुग्ण : स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीत नव्या रुग्णांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब आहे. स्पेनमध्ये सुमारे १० हजार ७००, फ्रान्समध्ये सुमारे २४००, तर जर्मनीत २२०० च्या आसपास नवे रुग्ण आढळले आहेत.

Web Title: CoronaVirus: Corona victims over 22,000 worldwide; Most deaths in Italy, Spain, China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.