coronavirus: कोरोना कधीच परत जाणार नाही, जागतिक आरोग्य संघटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:15 AM2020-05-15T06:15:33+5:302020-05-15T06:16:04+5:30

आम्ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे मला वाटते. हा विषाणू कधी नाहिसा होईल याबद्दल कोणी काही भाकित करू शकेल, असे मला वाटत नाही.

coronavirus: Corona will never return, World Health Organization | coronavirus: कोरोना कधीच परत जाणार नाही, जागतिक आरोग्य संघटना

coronavirus: कोरोना कधीच परत जाणार नाही, जागतिक आरोग्य संघटना

Next

जीनिव्हा : कोरोना विषाणू (कोविड-१९) हा आता कदाचित परत जाणारा नसेल. एचआयव्हीसारखा हा रोग विशिष्ट ठिकाणी किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांना होणारा (एनडेमिक) असा झाला असू शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने ‘हू’ म्हटले. कोरोना किती दिवस फिरत राहणार आहे याबद्दलचे अंदाज न करण्याचा इशारा देऊन हूचे आणीबाणी तज्ज्ञ माईक रायन यांनी या विषाणूला तोंड देण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.
‘‘आम्ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे मला वाटते. हा विषाणू कधी नाहिसा होईल याबद्दल कोणी काही भाकित करू शकेल, असे मला वाटत नाही. हा आजार मोठा प्रश्न बनून स्थिरावेल किंवा तसे कदाचित होणारही नाही.’’ विषाणूबद्दल ना कोणती तारीख आहे ना कोणते आश्वासन. उद्या या विषाणूवरील लस सापडली तरी मोठ्या प्रमाणावर त्याला तोंड द्यावे लागेल, असे रायन म्हणाले.
कोरोना साथीमुळे जागतिक स्तरावरील विकासाला मोठा फटका बसणार असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी व्यक्त केली
आहे.
ते म्हणाले की, प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच अन्य आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करण्याकडे सर्व देशांनी आता लक्ष द्यायला हवे. ही वस्तुस्थिती कोरोना विषाणूच्या साथीमुळे अधोरेखित झाली आहे. जगात अनेक आजारांचा सामना लोक करीत असतात; पण कोरोना साथीची गोष्ट निराळीच आहे. सुसज्ज आरोग्य यंत्रणा व आरोग्य सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
घेब्रेसिस यांनी सांगितले की, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अधिक उत्तम जीवन जगण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांत २००० ते २०१६ या कालावधीत २१ टक्के वाढ झाली.
उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये याच कालावधीत ही वाढ फक्त ४ टक्क्यांनी झाली. याचा अर्थ असा की, जागतिक स्तरावर अनेक देशांत तेथील नागरिक पूर्वीपेक्षा उत्तम आयुष्य जगू शकतात. मात्र, काही क्षेत्रांत अनेक देश पिछाडीला राहिले आहेत. कॅन्सर, मधुमेह, हृदय, फुफ्फुस यांचे विकार नियंत्रणात ठेवण्यासाठी अजून बºयाच देशांत पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण झाल्या नाहीत. (वृत्तसंस्था)

मलेरिया फैलावण्याचा धोका

काही देशांमध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात त्यांना अपयश आले आहे. अशा स्थितीत जगभरात मलेरियाची साथ पुन्हा डोके वर काढू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसिस यांनी दिला आहे.

Read in English

Web Title: coronavirus: Corona will never return, World Health Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.