Coronavirus: कोरोना विषाणूही कमजोर होण्याची शक्यता; अमेरिकेतील संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:41 PM2020-05-07T23:41:05+5:302020-05-08T07:14:13+5:30
या प्रयोगासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी वापरले आहे.
अॅरिझोना : कोरोना विषाणू स्वत:मध्ये अंगभूत बदल घडवत असून, तो २००३ साली आलेल्या सार्स साथीच्या विषाणूप्रमाणे हळूहळू कमजोर होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाने या संदर्भात केलेल्या प्रयोगातून काढला आहे.
या प्रयोगासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी वापरले आहे. हा रोग पसरविणाऱ्या विषाणूच्या प्रत्येक नव्या पिढीतील १६ हजार नमुने जीआयएसएआयडी या स्वयंसेवी संस्थेने जागतिक स्तरावर स्थापन केलेल्या गुणसूत्रांच्या बँकेत जपून ठेवले आहेत. ‘‘२००३ मध्ये पसरलेल्या सार्स साथीचा विषाणू काही काळाने कमजोर झाला. तशीच प्रक्रिया कोरोनाच्या विषाणूबाबत होण्याची शक्यता दिसत आहे. सार्सच्या विषाणूमध्ये कालांतराने इतके अंगभूत बदल झाले, की त्याची उपद्रवशक्ती आपसूक कमी होत गेली. तसेच कोरोना विषाणूबाबत होऊ शकते,’’ असे संशोधक मॅथ्यू स्कॉच यांनी म्हटले आहे.