Coronavirus: 'त्यांनी' अल्लाहची माफी मागावी; ट्रोल झाल्यानंतर इम्रान खान यांच्याकडून ट्विट डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:34 PM2020-04-09T17:34:38+5:302020-04-09T17:48:53+5:30
त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना एक संदेश लिहिला होता.
इस्लामाबादः जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अनेक देशांत लॉकडाऊनची परिस्थिती असून, 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर पडू नये. तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीतदेखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना एक संदेश लिहिला होता.
ट्विटमध्ये ते लिहितात, मी जगभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, आज रात्री शब-ए-बारातनिमित्त खासकरून नाफिल नमाजनिमित्त अल्लाहची प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडे क्षमा आणि आशीर्वाद घ्यावेत. ' मात्र, ट्रोल झाल्यावर त्यांनी ते ट्विट एका तासात हटवले आहे. गुरुवारी पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 248 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह संक्रमित कोरोनाची संख्या 4,322 वर गेली आहे. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊननंतरही अनेकांना विषाणूचा प्रसार लवकर थांबविण्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या मते, या संसर्गामुळे देशात आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू एका दिवसात झाला आहे. आतापर्यंत एकूण 572 लोक कोरोनातून बरे झाले असून, 31 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीसुद्धा या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय मदतही पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधली विमान सेवाही खंडित करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊन केलेल्या शहरांत शाळा, कॉलेज, दुकानं, ऑफिस, बाजार, मॉल्स, सिनेमागृह हे सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सुविधाच सुरू राहणार आहेत. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा अमानुष चेहरा समोर आला. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे. कराचीच्या रेहड़ी घोथमध्ये हजारो गरीब लोक धान्य आणि दैनंदिन गोष्टींकडे पोहचले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर अनेक हिंदूंच्या वाट्याला निराशा आली. त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही इथून जा, रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. तेथील सिंध प्रशासनाने स्थानिक गरीब मजुरांना रेशन वाटप करण्याची व्यवस्था केली होती.Those friends who were justifying PM Imran Khan's Shab e Baraat tweet which he did today after it had passed last night, can you please tell me why he has deleted it after an hour? 😂 pic.twitter.com/bEY4BsvOYx
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) April 9, 2020