coronavirus: पाकिस्तानमध्ये कोरोना बेलगाम, रुग्णसंख्या सव्वा लाखांवर, अर्थव्यवस्थाही कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:53 PM2020-06-12T18:53:47+5:302020-06-12T20:21:46+5:30

गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनामुळे १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५००च्या जवळ पोहोचली आहे

coronavirus: Coronavirus spread in Pakistan, over 1.5 lacks patients, economy collapses | coronavirus: पाकिस्तानमध्ये कोरोना बेलगाम, रुग्णसंख्या सव्वा लाखांवर, अर्थव्यवस्थाही कोलमडली

coronavirus: पाकिस्तानमध्ये कोरोना बेलगाम, रुग्णसंख्या सव्वा लाखांवर, अर्थव्यवस्थाही कोलमडली

Next

इस्लामाबाद - सध्या भारतात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही कोरोना बेलगाम झाला आहे. येथे कोरोनाच्या संसर्गाने वेग घेतला असून, गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनाचे  ६ हजार ४०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखाच्या पार पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनामुळे १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५००च्या जवळ पोहोचली आहे. 

पाकिस्तानमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या सव्वा लाख  रुग्णांपैकी सुमारे चाळीस हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब आणि सिंध या प्रांतांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली. आहे. 

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असला तरी येथे कोरोनाच्या चाचण्या मात्र म्हणाव्या तशा वेगाने होत नाही आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सुमारे आठ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर दररोज २५ हजार चाचण्या होत आहेत. 

अर्थव्यवस्थेचा विचार करून पाकिस्तानमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आले नव्हते. प्रांतीय सरकारांनी आपल्या सोईप्रमाणे लॉकडाऊन लागू केले होते. मात्र केंद्रीय सरकारने तसे करण्यास नकार दिला होता. तरीही कोरोनामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या काळात सुमारे तीन ट्रिलीयन डॉलर एवढे नुकसान झाल्याचा पाकिस्तान सरकारचा दावा आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आले असून, लॉकडाऊन हटवल्यापासून तेथील कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

Web Title: coronavirus: Coronavirus spread in Pakistan, over 1.5 lacks patients, economy collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.