Coronavirus: ए भाऊ, हलक्यात नको घेऊ! कोरोनाग्रस्त महिलेचा आयसीयूतला व्हिडीओ व्हायरल; काय म्हणते, पाहा..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:44 PM2020-03-23T12:44:20+5:302020-03-23T12:47:35+5:30
सध्या मी तुमच्याशी बोलू शकते ही अवस्था पूर्वीपेक्षा दहापटीने चांगली आहे. कोरोनामुळे तिच्यावर काय संकट आलं हे तिच्या अवस्थेकडे पाहून अंदाज लावता येतो.
लंडन – जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक पसरत चालला आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वाधिक वयोवृद्ध लोक सापडत असल्याचं दिसून येतं. मात्र कोरोनाच्या जाळ्यात काही युवा वर्गही अडकला आहे. या लोकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या ३९ वर्षीय तारा लँगस्टनचा हा व्हिडीओ आहे. यात ती सांगते की, सुरुवातीला मी कोरोना व्हायरसला गंभीरतेने घेतले नाही. पण आता कोरोनाची लागण तिला झाल्याने पुन्हा असं व्हायला नको असं म्हणते. जर कोणीही संधी घेण्याचा विचार करत असेल तर माझी अवस्था पाहा. आयसीयूत दाखल केलेली तारा तिच्यावर सुरु असणारे उपचार दाखवते. ज्या आरोग्य साहित्यांमुळे ती श्वास घेऊ शकते. सध्या ती कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे.
व्हिडीओ बनवताना तिने सांगितले की, सध्या मी तुमच्याशी बोलू शकते ही अवस्था पूर्वीपेक्षा दहापटीने चांगली आहे. कोरोनामुळे तिच्यावर काय संकट आलं हे तिच्या अवस्थेकडे पाहून अंदाज लावता येतो. ताराने मेल ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, माझ्या फुफुस्सात काच अडकल्यासारखं वाटतं. पहिल्यांदा मला वाटायचे की कोरोना व्हायरसला गरजेपेक्षा अधिक धोकादायक दाखवलं जातं आहे. मात्र कोरोना झाल्यानंतर तिला पुन्हा असं कधी होऊ नये असं वाटू लागलं आहे. हा खूप वेदनादायक अनुभव आहे. त्यामुळे लोकांनी कोणतीही चूक करु नये अन्यथा त्यांची अवस्था माझ्यासारखी होईल असं आवाहन तिने केलं.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लोकांना एकमेकांपासून अंतर ठेवण्यास सांगितले आहे. मात्र अद्यापही लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे लोकांना कळायला हवं स्वत:ला विलग ठेवणं हा एकमेव पर्याय आहे. तसेच सिगारेट पिणाऱ्यांनी सिगरेट सोडावी असंही ताराने सांगितले. ताराची तब्येत आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे. लवकरच तिला आयसीयूच्या बाहेर आणलं जाईल.
ब्रिटनमध्ये परिस्थिती चिंताजनक
देशाची परिस्थिती पाहता लोकांनी एकत्र जमू नये, सरकारच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. आवश्यक नसेल तर प्रवास करु नये, सरकारने १५ लाख लोकांना १२ आठवडे घरात राहायला सांगितले आहे. आतापर्यंत देशात ५ हजार ६८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८१ जणांचा मृत्यू झाला आहे.