CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:53 PM2021-06-23T20:53:18+5:302021-06-23T20:55:16+5:30

या संशोधकांनी कंप्‍यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. (Covid-19 could be spread by trees pollen)

CoronaVirus Covid-19 could be spread by trees pollen can carry hundreds of virus particles warn scientists | CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

CoronaVirus : चिंताजनक...! झाडांपासूनही जगभरात पसरू शकतो कोरोना व्हायरस? वैज्ञानिकांचा मोठा दावा

Next

निकोसिया - कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या जगासाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. कोरोनासारखे शेकडो व्हायरस झाडांच्या परागकणांपासूनही (trees pollen) पसरू शकतात. महत्वाचे म्हणजे, परागकणांपासून गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती अधिक आहे, असा इशाराही वैज्ञानिकांनी एका ताज्या संशोधनात दिला आहे. सायप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीतील एका संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या संशोधकांनी कंप्‍यूटरवर विलोच्या झाडांचे मॉडेल तयार केले आहे. जे मोठ्या प्रमाणावर परागकण सोडते. याच बोरबर याचे कन कशा प्रकारे पसरतात, हेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी दिलासादायक गोष्ट म्हणजे, हे परागकण गर्दीपासून फार वेगाने दूर निघून जातात. या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 6 फुटांचे सोशल डिस्‍टंसिंग नेहमीच पुरेसे ठरणार नाही.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

व्‍यापक मॉडलच्या आधारे तयार केले कंप्‍यूटर चित्र -
यासंदर्भात, संशोधकांनी सल्ला दिला आहे, की ज्या ठिकाणी हवेत परागकणांचा स्थर अधिक आहे, तेथे ते कमी करण्यावर लक्ष द्यायला हवे. ते म्हणाले, एक झाड एका दिवसात सरासरी प्रति क्‍यूबिक फुटावर 40 परागकणांपेक्षा अधिक हवेत सोडू शकते. एवढेच नाही, तर प्रत्येक कनात हजारो व्हायरल पार्टिकल्स असू शकतात. हे संशोधन भौतिकशास्त्रज्ञ तालिब दबोउक आणि इंजीनिअर दिमित्रियस ड्रिकाकिस यांनी केले आहे.

या संशोधकांनी एका व्‍यापक मॉडेलच्या आधारे एक कंप्‍यूटर चित्र तयार केले आहे. यात सांगण्यात आले आहे, की परागकण विलोच्या झाडांपासून हवेच्या माध्यमाने कशा प्रकारे पसरतात.  दिमित्रियस ड्रिकाकिस म्हणाले, आशा आहे, की या संशोधनामुळे लोकांचे झाडांवर अधिक लक्ष जाईल. त्यांचे हे संशोधन जर्नल Physics of Fluids मध्ये प्रकाशित झाले आहे.

Web Title: CoronaVirus Covid-19 could be spread by trees pollen can carry hundreds of virus particles warn scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.