Coronavirus: तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांना मोठा दिलासा; कोरोना संक्रमणाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:52 PM2021-08-20T14:52:08+5:302021-08-20T14:56:07+5:30

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा परिणाम लहान मुलांवर कमी पाहायला मिळतो. परंतु नवजात बालकांना अधिक काळ ICU मध्ये राहण्याची वेळ येते.

Coronavirus: Covid 19 severity correlates with age dependent lung cell features | Coronavirus: तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांना मोठा दिलासा; कोरोना संक्रमणाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

Coronavirus: तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांना मोठा दिलासा; कोरोना संक्रमणाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

Next
ठळक मुद्देवयस्कांना कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर खूप काळ त्यांच्यात अनेक लक्षणं आढळतातशरीरात कुठल्या प्रकारच्या पेशी कोरोना व्हायरसमुळे जास्त संक्रमित होतात हे शोधण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत.जितके लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यातील बहुतांश वयस्क आहेत. विशेष त्यात वृद्धांचा समावेश आहे.

कोरोना व्हायरसचा धोका वयानुसार होत असल्याचं आढळत आहे. याबाबत एका नव्या स्टडीमध्ये दावा करण्यात आला आहे. कमी वयाच्या लोकांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षण आढळत नाहीत. वयस्क लोकांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. नेमकं यामागे काय कारण आहे याचा शोध घेणे वैज्ञानिकांना कठीण झालं आहे. परंतु कुठल्या द्रव्यामुळे वाढत्या वयातील लोकांमध्ये कोरोना संक्रमण आढळते याचा शोध घेतला गेला आहे.

सायन्स एडवांसेस जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, एंजियोटेनसिन कन्वर्टिंग एंजाइम २ प्रोटीन आणि MRNA मिळून सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2 (SARS COV 2) रिसीव करतात. वाढत्या वयानुसार हे वाढत जाते. मानवी शरीरात ACE2 उच्च श्रेणीचं हेटरोजनेटी दिसून येतात. त्यानंतर कोरोना संक्रमित पेशींना एंडोप्लासमिक रेटिकुलम स्ट्रेस जाणवू लागतो. त्यामुळे इम्यूनिटी कमकुवत होते तेव्हा कोरोना शरीरात संक्रमण पसरवतो. तर युवकांच्या फुस्फुस्सात असणाऱ्या एपिथेलिकल पेशी अशा प्रक्रिया होण्यापासून रोखतात. त्यामुळे कमी वयाच्या विशेषत: लहान मुलांना कोरोना व्हायरसचं गंभीर संक्रमण कमी पाहायला मिळतं. कोरोना व्हायरसमुळे १५ कोटीहून अधिक लोक संक्रमित झाले त्यापैकी ३० लाखाहून जास्त लोकांना जगभरात कोरोनामुळे मृत्यू झाला.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा परिणाम लहान मुलांवर कमी पाहायला मिळतो. परंतु नवजात बालकांना अधिक काळ ICU मध्ये राहण्याची वेळ येते. मात्र मोठ्या मुलांमध्ये इतका त्रास जाणवत नाही. वयस्क लोकांच्या शरिरात इम्यूनिटी वाढण्याऐवजी कमी का होतेय अशी चिंता वैज्ञानिकांना लागली आहे. ACE2 प्रोटीन आणि mRNA मुलांमध्ये कोविड संक्रमण होण्यापासून रोखण्यास यशस्वी ठरले आहे. तर वयस्कांमध्ये संक्रमण गंभीर होत आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, वयस्कांना कोरोना संक्रमणातून बरे झाल्यानंतर खूप काळ त्यांच्यात अनेक लक्षणं आढळतात. कारण ACE2 फुस्फुस्सामध्ये असतो. परंतु विविध प्रकार पेशींमध्ये कोरोना संक्रमण पोहचवण्यासाठी मदत करतात. शरीरात कुठल्या प्रकारच्या पेशी कोरोना व्हायरसमुळे जास्त संक्रमित होतात हे शोधण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. शरीरात कोविड १९ आजार पसरण्यापासून  विविध विविध पेशींमध्ये त्याचा परिणाम कसा होता त्यावर पुस्तक लिहिलं जाऊ शकतं.

न्यूयॉर्क सिटी हेल्थ आणि सीडीसी आकडेवारीनुसार, जितके लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यातील बहुतांश वयस्क आहेत. विशेष त्यात वृद्धांचा समावेश आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचं संक्रमण कमी आढळत आहे. परंतु नवजात मुलांसाठी हे धोकादायक आहे. लहान मुलांच्या तुलनेत वयस्कांचा मृत्यू दर अधिक आहे. ६५ आणि त्यावरील वयाचे लोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. कोरोना संक्रमणाचा धोका या लोकांना जास्त आहे. परंतु लहान मुलांमध्ये त्याचा प्रभाव एवढा दिसत नाही.

Web Title: Coronavirus: Covid 19 severity correlates with age dependent lung cell features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.